एअरपोर्टवर पोहोचताच कपल्स होतात वेगळे; ‘Airport Divorce’ ट्रेंड व्हायरल




एअरपोर्टवर पोहोचताच कपल्स होतात वेगळे; ‘Airport Divorce’ ट्रेंड व्हायरल


सोशल मीडियावर दररोज नवे ट्रेंड व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका वेगळ्या ट्रेंडची जोरदार चर्चा सुरू आहे आणि तो म्हणजे ‘Airport Divorce’. नाव ऐकताच अनेकांना हा ट्रेंड नातं तुटणं किंवा घटस्फोटाशी संबंधित असल्याचा गैरसमज होतो. मात्र प्रत्यक्षात याचा घटस्फोटाशी काहीही संबंध नाही. उलट, प्रवास अधिक शांत, आनंददायी आणि वादमुक्त करण्यासाठी काही जोडपी ही पद्धत वापरत असल्याचं पाहायला मिळत आहे.

नेमकं काय आहे ‘Airport Divorce’?
‘Airport Divorce’ म्हणजे विमानतळावर बॅग चेक-इन झाल्यानंतर आणि बोर्डिंग होईपर्यंत काही काळ जोडीदारांनी स्वतंत्रपणे वेळ घालवणे. काहींना फ्लाइटची वाट पाहताना शॉपिंग करायला आवडतं, काहींना पुस्तक वाचत बसायला, तर काहींना कॅफेमध्ये शांतपणे कॉफीचा आस्वाद घ्यायला आवडतो. अशावेळी दोघेही आपल्या आवडीनुसार वेळ घालवतात आणि बोर्डिंगच्या वेळी पुन्हा एकत्र येतात.

हा ट्रेंड का चर्चेत आला?
हा शब्द ट्रॅव्हल रायटर ह्यू ऑलिव्हर यांनी 2025 मध्ये एका लेखातून लोकप्रिय केला. त्यांनी सांगितलं की, त्यांची आणि त्यांच्या पत्नीची प्रवास करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे विमानतळावर काही काळ स्वतंत्र राहिल्याने अनावश्यक वाद टळतात आणि प्रवास अधिक सुखकर होतो यानंतर अनेक कपल्सनी सोशल मीडियावर स्वतःचे अनुभव शेअर केले आणि हा ट्रेंड व्हायरल झाला.

कपल्स हा ट्रेंड का स्वीकारतायत?
– प्रत्येकाची प्रवास करण्याची सवय वेगळी असते.
– विमानतळावरील घाई-गडबड आणि ताण कमी होतो.
– छोट्या-छोट्या गोष्टींवर होणारे वाद टाळता येतात.
– प्रत्येकाला स्वतःसाठी थोडा ‘Me Time’ मिळतो.
– बोर्डिंगपूर्वी दोघेही रिलॅक्स मूडमध्ये पुन्हा एकत्र येतात.



Comments are closed.