रोहि-राटची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी! ठरली भारतासाठी हा कारनामा करणारी तिसरी जोडी
टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून दोन्ही संघात 3 वनडे सामन्यांची मालिका सुरू असून पहिला सामना टीम इंडियाने जिंकला होता. या मालिकेत भारतीय संघाचे स्टार रोहित शर्मा (Rohit Sharma & Virat Kohli) आणि विराट कोहली देखील खेळत असून पहिल्या सामन्यात दोघेही फ्लॉप ठरले. रोहित शर्मा 11 तर विराट कोहली 5 धावा करून बाद झाला होता.
पहिल्या सामन्यातील खराब कामगिरीनंतर दुसऱ्या वनडे सामन्यात दोघांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. रोहित शर्माने मैदानावर टिकून राहण्याचा प्रयत्न केला, पण तो 47 चेंडूत फक्त 26 धावा करून बाद झाला. जरी रोहित लवकर बाद झाला असला, तरी त्याने आणि विराट कोहलीने मिळून दुसऱ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. या भागीदारीसह या जोडीने एक मोठा टप्पा गाठला आहे. (Rohirat Create history against England)
रोहित शर्मा आणि विराट कोहलीची जोडी आता क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून सर्वाधिक धावा करणारी तिसरी भारतीय जोडी ठरली आहे. या जोडीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8,000 धावांची भागीदारी पूर्ण केली आहे. यापूर्वी फक्त दोन भारतीय जोड्यांनीच हा पराक्रम केला होता. तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावांची भागीदारी करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar & Saurav Ganguly) आणि सौरव गांगुली यांच्या नावावर आहे, ज्यांनी 12 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.
त्यानंतर सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांची जोडी दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यांच्या नावावर 11 हजारांहून अधिक धावांची भागीदारी आहे.
तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावांची भागीदारी करणाऱ्या भारतीय जोड्या:
12,400 – सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली
11,037 – सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड
8,008 – रोहित शर्मा आणि विराट कोहली *
7,626 – सौरव गांगुली आणि राहुल द्रविड
7,199 – वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर
Comments are closed.