बांधकाम साईटवरील टॉवर क्रेन कोसळून एक ठार, दोघे जखमी; घोडबंदरमध्ये घडली दुर्घटना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मीरा रोड पूर्व भागातील घोडबंदर परिसरातील जेपी नॉर्थ गृहसंकुलाच्या शेजारी सुरू असलेल्या बांधकाम साईटवरील टॉवर क्रेन गुरुवारी सायंकाळी कोसळली. या दुर्घटनेत क्रेनचालक जागीच ठार झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही क्रेन जे. के. आयरिश सोसायटीच्या पार्किंगमध्ये कोसळल्याने चारचाकी गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

घोडबंदर परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. याच साईटवर टॉवर क्रेन बसवण्यात आली असून 11 व्या मजल्यापर्यंत काम पूर्ण झालेले आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे काम सुरू असताना सायंकाळी अचानक क्रेन कोसळली. या दुर्घटनेत क्रेनचालक मोहम्मद खोकर (21) हा जागीच ठार तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले.

दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी काशिगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Comments are closed.