राजकारणातून संपवण्यासाठी अघोरी मंत्रविधी, छत्रपती संभाजीनगर हादरलं, झाडाला फोटो टांगून जादूटोण्
छत्रपती संभाजीनगर गुन्हा: भाऊबंदकीचा वाद आणि राजकीय वैमनस्यातून थेट काळ्या जादूचा (black magic) भयानक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) समोर आला आहे. सातारा (Satara) गावात माजी सरपंच फेरोज पटेल आणि त्यांच्या तीन भावांना जादूटोणा करून संपवण्याचा धक्कादायक कट रचण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी (Police) आरोपी आयुबखान उर्फ अय्युबखान जब्बारखान पठाण याला बेड्या ठोकल्या असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
Chhatrapati Sambhajinagar Crime: असा रचला होता जादूटोण्याचा कट
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सातारा गावातील राजकीय वर्चस्व आणि व्यावसायिक वादातून हा संपूर्ण प्रकार घडला. आरोपी आयुबखान याने एका मांत्रिकाला हाताशी धरून माजी सरपंच फेरोज पटेल आणि त्यांच्या भावांचे फोटो एका झाडावर टांगले होते. त्या फोटोंवर विधी करून त्यांना जीवे मारण्याचा किंवा मोठे नुकसान करण्याचा अघोरी प्रयत्न सुरू होता. एवढेच नव्हे, तर फेरोज पटेल आणि त्यांच्या कुटुंबियांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून तुरुंगात धाडण्याचा कटही आरोपीने रचला होता.
Chhatrapati Sambhajinagar Crime: विश्वासू चालकानेच केला गेम ओव्हर!
या संपूर्ण काळ्या कृत्याचा आणि कटाचा पर्दाफाश आरोपी आयुबखानच्याच एका विश्वासू चालकाने केला आहे. मोहम्मद इर्शाद मोहम्मद उमर हा आरोपी आयुबखानकडे अंगरक्षक आणि चालक म्हणून काम करत होता. जादूटोणा करण्यासाठी मांत्रिकाला गाडीतून आणणे-नेणे, अघोरी पूजेचे साहित्य आणणे आणि ठरलेल्या निर्जन ठिकाणी जाणे, ही सगळी कामे आयुबखान चालक मोहम्मद इर्शादकडून करून घेत होता. काही दिवसांतच चालकाला आपल्या मालकाचा हा अघोरी आणि बेकायदेशीर कारभार लक्षात आला. हे पाप आपल्या हातून घडू नये म्हणून इर्शादने तातडीने आयुबखानची नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतर त्याने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि या संपूर्ण धक्कादायक घडामोडींची सविस्तर माहिती पोलिसांना दिली.
Chhatrapati Sambhajinagar Crime: आरोपीला बेड्या
चालक मोहम्मद इर्शाद याने दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. या जबाबामुळे पोलिसांना तपासाची दिशा मिळाली आणि त्यांनी मुख्य आरोपी आयुबखान पठाण याला अटक केली. या अघोरी विधीमागे आणखी कोणाचे डोके आहे का? आरोपीला मदत करणारे इतर संशयित कोण आहेत? आणि तो मांत्रिक नेमका कोण आहे? या सर्व बाजूंचा तपास पोलीस करत आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Comments are closed.