नाशिककरांची लूट सुरू, मंत्री गिरीश महाजन यांच्या आशीर्वादाने महापालिकेत घोटाळेच; शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
मंत्री गिरीश महाजन यांच्या आशीर्वादाने नाशिक महापालिकेत कोटय़वधी रुपयांचे घोटाळे सुरू आहेत, असा खळबळजनक आरोप एकनाथ शिंदे गटाच्या नगरसेविका किरण गामणे-दराडे यांनी आज महापालिका स्थायी समिती सभेत केला. घरचा आहेर दिल्याने भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे.
महापालिका स्थायी समितीची सभा गुरुवारी सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नाशिकच्या इंदिरानगर येथील राजसारथी सोसायटीच्या जागेचा टीडीआर घोटाळा हा मंत्री गिरीश महाजन यांच्या आशीर्वादाने झाला. भाजपच्या महिला आमदाराचा त्यांच्या समर्थकाला या प्रकरणात पाठिंबा आहे, असा आरोप एकनाथ शिंदे गटाच्या नगरसेविका किरण गामणे-दराडे यांनी केला. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली. समितीद्वारे चौकशी करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या. 8 हजार 211 चौरस मीटर जागेच्या दुप्पट म्हणजे 16 हजार 422 चौरस मीटरचा टीडीआर देण्यात आल्याचा हा घोटाळा आहे. दरम्यान, हा प्रस्ताव रीतसर मंजूर करण्यात आल्याचे नगररचना उपसंचालक रितेश चव्हाण यांनी सांगितले.
अडीचशे कोटींचा स्टाररेट, खेळण्यांचे टेंडर या घोटाळ्यातही पह्नवरून वरिष्ठांचे आदेश आहेत, असे अधिकारी सांगतात, असाही आरोप गामणे यांनी केला. याचीही चौकशी करा, नाशिककरांची लूट थांबवा, अशी मागणी केली. या प्रकाराने सभापती असलेले भाजपचे मच्छिंद्र सानप, भाजप नगरसेवकांची चांगलीच काsंडी झाली. ‘महाजन हे पुंभमेळा मंत्री आहेत, जिह्याचे पालक आहेत, त्यांच्यावर केलेले आरोप मागे घ्या, त्यांच्याबाबतचे आक्षेप मागे घ्या’, असे सानप यांनी गामणे यांना सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
Comments are closed.