नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; गुजरातमधून अटक
वाशिम : सामाजिक मीडिया (सोशल मीडिया) हे केवळ जनसंपर्क आणि मनोरंजनाचा माध्यम राहिलं नसून गुन्हेगारीच्या घटना देखील यातून समोर येत आहेत. अनेकदा उत्साहाच्या भरात आपण सोशल मीडियातून माहिती सार्वजनिक करतो. मात्र, काहीवेळा तेच आपल्या अंगलट येतं, असेही प्रकार घडले आहेत. तर, वाशिम (Washim) जिल्ह्यात पोलिसांनी याच सोशल मीडियाचा आधार घेत 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यातील महिला आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी महिला आपल्या पतीसमवेत गुजरातला राहात होती. मात्र, केवळ सोशल मीडियातील फोटोमुळे आरोपी महिलेचा अटक करण्यात पोलिसांनी यश आलं आहे.
शहरातील पंचशील नगरमध्ये 22 वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या एका महिलेला वाशिम पोलिसांनी गुजरातमधून अटक केली. खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या या आरोपीनं स्वतःची ओळख बदलली, राज्य बदललं, ओळख पटू नये याकरिता मोबाईल न वापरता दुसरं लग्न करून नवं आयुष्यही सुरू केलं होतं. मात्र, आरोपी महिलेच्या पतीनं सोशल मीडियावर अपलोड केलेल्या एका फोटोनं पोलिसांना सुगावा लागला आणि आरोपी पंचशीला थोरात हिला पोलिसांनी बेडया ठोकल्या. त्यामुळे, सोशल मीडियावरचा तो फोटो आरोपीला पुन्हा तुरुंगात पोहोचवण्यास कारणीभूत ठरला.
न्यायालयाने ठोठावली शिक्षा, जामीनावर होती बाहेर
प्रेमसंबंध, लिव्ह-इन रिलेशनशिप, मधून निर्माण झालेला वाद यातून पंचशीला थोरात हिने 2004 साली तिचा प्रियकर संतोष गोटे याची हत्या करत मृतदेह घरात खोदून मृतदेह गाडला होता. या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर उच्च न्यायालयानेही तिची जन्मठेपेठेची शिक्षा कायम ठेवली मात्र दरम्यानच्या काळात तिला जमीन मंजूर झाला होता. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होतं. मात्र, 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं पंचशीला थोरातची जन्मठेपेची शिक्षा कमी करून तिला 10 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून फरार असलेली महिला आरोपीचा शोध घेत होते. मात्र आरोपी महिला स्वतःचा मोबाईल वापरत नसल्यानं आणि नातेवाईकांच्या जास्त संपर्कात नसल्यानं पोलिसांना सापडत नव्हती. अखेर पोलिसांना सोशल मीडियावर सापडलेला फोटो आणि तांत्रिक तपास करून पंचशीला थोरातला गुजरातच्या खंबालिया येथून अटक केली. त्यानंतर, पोलिसांनी आरोपी महिलेला न्यायालयासमोर हजर केला आहे. त्यामुळे, आता तिच्यावर तुरुंगातून फरार झाल्याचाही वेगळा गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
Comments are closed.