वेस्ट इंडिजचे महान खेळाडू गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन
वेस्ट इंडीजचे माजी कर्णधार सर गारफिल्ड सोबर्स (गॅरी सोबर्स) यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. सोबर्स यांचा मुलगा डॅनियल याने त्यांच्या निधनाची पुष्टी केली. बार्बाडोस येथील निवासस्थानी सोबर्स यांनी अखेरचा श्वास घेतला. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या सोबर्स यांनी मार्च 1954 ते एप्रिल 1974 या काळात 93 कसोटी सामने खेळले.
वेस्ट इंडीज क्रिकेटला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिल्याबद्दल गॅरी सोबर्स यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. सोबर्स हे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलग चेंडूंवर सहा षटकार मारणारे पहिले खेळाडू होते. त्यांनी 1968 मध्ये नॉटिंगहॅमशायरकडून खेळताना ग्लॅमॉर्गनविरुद्ध ही कामगिरी केली होती. आयसीसी (ICC) 2004 पासून दरवर्षी ‘मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कारासाठी ‘सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी’ प्रदान करते.
Comments are closed.