रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांवर अखेर पडदा; बीसीसीआयने सांगितलं खरं काय?
भारतीय संघाचा अनुभवी Team India सलामीवीर रोहित शर्मा Rohit Sharma याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत सुरू Rohit Sharma Retirement असलेल्या चर्चांवर बीसीसीआयने BCCI आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी दुजोरा दिला आहे की, रविवारी लॉर्ड्सवर होणारा इंग्लंडविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना हा रोहितचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नसेल.
पीटीआयशी (PTI) बोलताना देवजित सैकिया Devajit Saikia म्हणाले, “रोहित शर्माच्या भविष्याबाबत माध्यमांमध्ये अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र, लॉर्ड्सवरील सामना हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल, अशी कोणतीही चर्चा बीसीसीआयमध्ये झालेली नाही.”
ते पुढे म्हणाले, “रोहित शर्मा हा भारतीय एकदिवसीय संघाचा नियमित सदस्य आहे. जोपर्यंत तो संघाच्या योजनांचा भाग आहे, तोपर्यंत तो भारतासाठी खेळत राहील. त्यामुळे, लॉर्ड्सवरील तिसरा एकदिवसीय सामना हा त्याचा शेवटचा सामना नाही.”
अलीकडच्या काळात अशा काही बातम्या आल्या होत्या की, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी रोहित शर्माला कळवले आहे की, 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या योजनांमध्ये त्याचा समावेश नाही. यामुळे इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर रोहित निवृत्तीची घोषणा करू शकतो, अशी चर्चा सुरू झाली होती.
काही अहवालांमध्ये असेही म्हटले होते की, विराट कोहलीचे Virat Kohli सध्याचे फॉर्म आणि तंदुरुस्ती पाहता त्याचे संघातील स्थान सुरक्षित असले, तरी रोहितबाबत निवड समितीचे मत वेगळे आहे. तसेच, भविष्यासाठी युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालला अधिक संधी देण्याचा विचार संघ करत असल्याचेही वृत्त होते.
रोहित शर्माच्या अलीकडील कामगिरीबाबतही प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्याने आपल्या शेवटच्या आठ एकदिवसीय डावांमध्ये 241 धावा केल्या आहेत. ज्यात त्याची सरासरी 30.1 आणि स्ट्राईक रेट 88.6 इतका राहिला आहे. या काळात त्याने केवळ एक अर्धशतक झळकावले आहे, ज्यामुळे त्याच्या भविष्याबाबत चर्चांना उधाण आले होते.
मात्र, बीसीसीआयच्या BCCI सचिवांच्या अधिकृत स्पष्टीकरणामुळे रोहित शर्माच्या संभाव्य निवृत्तीबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. यावरून हे स्पष्ट होते की, लॉर्ड्सवरील तिसरा एकदिवसीय सामना हा त्याचा शेवटचा सामना नसणार आणि तो अजूनही भारतीय संघाच्या योजनांचा भाग आहे, यावर बीसीसीआयने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.
Comments are closed.