आंतरराष्ट्रीय न्यायालयात हिंदुस्थानचा खर्च पाकिस्तान भरतोय, ‘सिंधू जल करारा’वर आतापर्यंत 6 लाख डॉलर्स खर्च
आंतरराष्ट्रीय न्यायालयात हिंदुस्थानचा खर्च स्वतःच्या खिशातून भरण्याची नामुष्की पाकिस्तानवर आली आहे. दोन्ही देशातील ‘सिंधू जल करारा’वरून पाकिस्तानने आतापर्यंत 5 कोटी खर्च भरला आहे. हिंदुस्थानने या लवादाच्या संपूर्ण प्रक्रियेवर बहिष्कार घातला असून ही कायदेशीर लढाई सुरू ठेवण्यासाठी पाकिस्तानला स्वतःच्या खर्चासोबतच भारताच्या वाट्याचाही लाखो डॉलर्सचा खर्च एकटय़ालाच सहन करावा लागत आहे.
सिंधू जल करारातील वाद निवारण नियमांनुसार, जेव्हा दोन्ही देशांमधील कोणताही वाद लवादाकडे जातो तेव्हा होणारा संपूर्ण कायदेशीर खर्च हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोघांना समप्रमाणात वाटून घ्यावा लागतो. मात्र, 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, हिंदुस्थानने आक्रमक पाऊल उचलत या कराराला तात्पुरती स्थगिती दिली. हिंदुस्थानने स्पष्ट केले की, जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवादाला कायमचा आणि पूर्णपणे पायबंद घालत नाही, तोपर्यंत या कराराशी संबंधित कोणत्याही प्रक्रियेत हिंदुस्थान सहभागी होणार नाही.
Comments are closed.