Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, ‘त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे…’

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, ‘त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे…’

अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील चोरीप्रकरणी शिवसेना ठाकरे पक्ष  आक्रमक झाली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आज रामरक्षा आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे. उद्धव ठाकरेंनी स्वत: दादर येथील राम मंदिरात जाऊन रामरक्षा आंदोलन केले होते. आज, 18 जुलै रोजी नागपुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हिंदूंना जागं करण्यासाठी रामरक्षा आंदोलन करण्यात येत आहे. याप्रकरणी सर्व तयारी करण्यात आली आहे. नागपूरच्या रामनगर येथील राम मंदिरात  आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून अयोध्येच्या राममंदिर दान विरोधात रामरक्षा पठण  आंदोलन ठेवण्यात आले. त्यापार्श्वभूमीवर  जैन मुनी निलेशचंद्र यांनी ठाकरेंना डिवचलं आहे.बाळासाहेबांचे विचार पूर्णपणे संपलेले आहेत. जेव्हा उद्धव ठाकरेंना हनुमान चालीसा वाचण्याची आवश्यकता होती, तेव्हा त्यांनी नवनीत राणा यांना 14 दिवस जेलमध्ये टाकलं. उद्धव ठाकरेंचं आंदोलन मी पाहिलं त्यांना धड वाचता देखील आलं नाही. उद्धव ठाकरेंना कुराण द्यायला पाहिजे होतं, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही. त्यांना श्राप लागलेला आहे. त्यांना शुद्धीकरण करण्याची गरज आहे. राम आमच्या आस्थेचं केंद्र आहे. आता जी बाबरी मस्जिद बनत आहे, तिथे देखील घोटाळा झाला आहे, त्याच्या विरोधात करणार नाही का तुम्ही काही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

Comments are closed.