एकतर्फी प्रेमाचा थरारक शेवट, आधी तरुणीला संपवलं, नंतर तरुणाने स्वत:च्या आयुष्याचा शेवट केला; ना
नाशिक क्राईम न्यूज : नाशिक (Nashik) शहरातील गुन्हेगारीच्या घटना थांबता थांबेनात, अशातच इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या (Indiranagar Police Station) हद्दीतून काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. काल शुक्रवारी रात्री एका तरुणीची हत्या करण्यात आल्यानंतर, आज शनिवारी पहाटेच्या सुमारास संशयित आरोपी तरुणाचाही मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. तरुणीला संपवल्यानंतर आरोपीने स्वतःचेही जीवन संपवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. (Nashik Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी वैष्णवी अनिल आवारे ही मूळची जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यामधील रहिवासी होती. ती अवघ्या 15 दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये आली होती आणि इंदिरानगर परिसरातील वनसंपदा सोसायटीत पेईंग गेस्ट (PG) म्हणून राहत होती. मात्र, तिच्या पाठोपाठ यवतमाळ (Yavatmal) येथील हल्लेखोर तरुणही नाशिकमध्ये (Nashik News) दाखल झाला होता.
Nashik Crime News: सोसायटीच्या गार्डनमध्ये तरुणीला संपवलं
शुक्रवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास वैष्णवी जेव्हा वनसंपदा सोसायटीच्या गार्डनजवळून जात होती, तेव्हा या माथेफिरू तरुणाने तिला गाठले. त्याने धारदार चाकूने वैष्णवीवर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात वैष्णवी रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला होता. या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
Nashik Crime News: पहाटे जॉगिंग ट्रॅकवर तरुणाचा मृतदेह आढळला
रात्रीपासून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत असतानाच, आज शनिवारी पहाटेच्या सुमारास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जॉगिंग ट्रॅकवर (Jogging Track) एका झाडाला तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. वैष्णवीला संपवून त्याने जॉगिंग ट्रॅकवर आपले जीवन संपवले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे नाशिक शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस करत आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
Comments are closed.