पावसाळ्यात डेंग्यू-चिकनगुनियाचा धोका टाळण्यासाठी पाळा हे नियम




डेंग्यू चिकनगुनिया प्रतिबंधक टिप्स मराठी


पावसाळा हा ऋतू जितका आनंददायी असतो, तितकाच तो आरोग्यासाठी आव्हानात्मक ठरतो. सध्या डेंग्यू आणि चिकनगुनिया पसरवणाऱ्या डासांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे, कारण या दिवसात साचलेलं पाणी डासांच्या प्रजननासाठी पोषक ठरतं. त्यामुळे या दिवसात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा धोका वाढतो. म्हणूनच, या पावसाळ्यात आजारांना दूर ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी नक्की पाळल्या पाहिजेत, यावर एक विशेष नजर टाकूयात.

पुढील नियम पाळा –

  1. डेंग्यूचे डास प्रामुख्याने स्वच्छ आणि साचलेल्या पाण्यात अंडी घालतात. त्यामुळे घरात आणि परिसरात पाणी साचू देऊ नका.
  2. कुलर, कुंड्यांचे ट्रे, जुने टायर, नारळाच्या करवंट्या आणि छतावर पडलेले भंगार साहित्य ताबडतोब स्वच्छ करा.
  3. घराबाहेर नारळाच्या करवंट्या, टायर, प्लास्टिकचे डबे किंवा कचरा साठू देऊ नका, जेणेकरून त्यात पाणी साचणार नाही.
  4. आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळा, ज्या दिवशी घरातील पाण्याची भांडी, टाक्या पूर्णपणे रिकाम्या करून सुकवून पुन्हा भराव्यात.
  5. घरात डास येऊ नयेत म्हणून खिडक्यांना जाळ्या बसवून घ्या.
  6. रात्री आणि विशेषतः दिवसा झोपतानाही  मच्छरदाणीचा वापर करा.
  7. घराबाहेर पडताना शरीर पूर्ण झाकणारे कपडे घाला आणि मॉस्किटो रिपेलेंट क्रीम किंवा रोल-ऑनचा वापर करा.
  8. शरीरातील डिहायड्रेशन टाळण्यासाठी नियमित आणि भरपूर पाणी प्या.
  9. आहारात व्हिटामिन C युक्त फळे, पालेभाज्या आणि पुरेसे पाणी यांचा समावेश करून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवावी.

तज्ज्ञांचा सल्ला –

तीव्र ताप, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागच्या भागात वेदना, सांधेदुखी आणि अंगावर पुरळयेणे ही डेंग्यू व चिकनगुनियाची प्रमुख लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसल्यास घरगुती उपचार किंवा स्वतःच्या मनाने औषधे न घेता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हेही वाचा – पावसाळी किटकांनी हैराण? वापरा या सोप्या ट्रिक्स



Comments are closed.