जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घ

उद्धव ठाकरे अभिजीत दिपके CJP प्रोटेस्ट दिल्ली जंतरमंतर: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्यासाठी काँकरोच जनता पार्टीचं दिल्लीतल्या जंतरमंतरवर आंदोलन (CJP Protest Delhi Jantar Mantar) सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) काल (21 जुलै) दिल्ली गाठली. त्यांनी आंदोलनकर्ते आणि सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

दीपके यांनी सोनम वांगचूक यांच्या उपोषणापासून सातत्यानं साथ दिल्याबद्दल उद्धव ठाकरेंचे आभार मानले. तर आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी, अभिजीतने पेटवलेली ही चिंगारी आता विझू देऊ नका. तुम्ही फक्त युवा नाही, तर देशाचं भविष्य आहात. मी तुम्हाला हिम्मत देण्यासाठी आणि तुमच्याकडून हिम्मत घेण्यासाठी आलो असल्याचं सांगत आंदोलन अधिक व्यापक करण्याचं आवाहन केलं. (Uddhav Thackeray Abhijeet Dipke CJP Protest)

मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, VIDEO: (Uddhav Thackeray CJP Protest Delhi Jantar Mantar)

जंतर मंतरवर उद्धव ठाकरेंनी जोरदार भाषण केलं. यावेळी टाळ्या वाजवत आंदोलनकर्त्यांनी त्यांना दाद दिली. यानंतर भाषण संपवून जेव्हा उद्धव ठाकरे मंचावरुन खाली उतरले, त्यावेळी खाली बसलेल्या आंदोलनकर्त्या मुलांनी त्यांना थांबवले. तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे, असं म्हणत विद्यार्थ्यांनी पोलिसांकडून झालेल्या मारहाणीची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांचं म्हणणं उद्धव ठाकरेंनी ऐकून घेतलं. (Uddhav Thackeray CJP Protest Delhi Jantar Mantar)

फक्त एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल- उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Abhijeet Dipke Delhi)

अभिजीत दीपके तुम्ही दिल्लीत आंदोलन करा, माझा प्रयत्न हे आंदोलन देशभरात कायम राहिलं पाहिजे. महाराष्ट्रात आम्ही सुरुवात केली आहे, महाराष्ट्र तुमच्यासोबत उभा आहे. महाराष्ट्राचा तरुण नेतृत्व करतोय, याचा अभिमान आहे,  असं उद्धव ठाकरे म्हणाले. अभिजीत दीपके यानं एक ठिणगी पेटवली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जीव गमावले त्यांचे फोटो इथं लावले आहेत. स्वतंत्र देशात विद्यार्थी पेपरफुटीमुळे आत्महत्या करत आहेत, आपल्याला त्या विद्यार्थ्यांचं स्मरण ठेवावं लागेल. निवडणुकीला तीन वर्ष आहेत, खूप वेळ आहे, आता आपलं युद्ध सुरु झालं आहे. फक्त एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल. जोपर्यंत सरकार बदलणार नाही, तोपर्यंत आपल्या आयुष्यात काही बदल होणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

सोनम वांगचुक यंचीवार यांनी सफदरजंग रुग्णावर उपचार सुरू केले- (उद्धव ठाकरे अभिजीत दिपके सीजेपी प्रोटेस्ट दिल्ली जंतरमंतर)

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी काँक्रोच जनता पार्टीचं दिल्लीतल्या जंतरमंतरवर आंदोलन सुरुच आहे. राजकीय नेत्यांनी आंदोलनस्थळी धाव घेतल्याने आंदोलक अधिकच आक्रमक झाले. आंदोलकांनी केंद्र सरकारला प्रचंड धारेवर धरलं. गुंडागर्दी नही चलेगी, तानाशाही नही चलेगीच्या घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला. दरम्यान आजही आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे आजही आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार अभिजीत दिपकेंनी केला. तर दुसरीकडे सोनम वांगचुक यांच्यावर सफदरजंग रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी तिथेच उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे.

संबंधित बातमी:

Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे

Comments are closed.