वंचित बहुजन आघाडीचा उद्या महाराष्ट्र बंद!
नीट परीक्षा आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱया विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून झालेला अमानुष लाठीहल्ला आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध नोंदवण्यासाठी ‘वंचित बहुजन आघाडी’ने 23 जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.
शांततेच्या मार्गाने हक्क मागणाऱया विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे ही लोकशाहीची गळचेपी आहे. पोलिसांनी आंदोलन करणाऱया विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंद आंदोलन करण्यात येत असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज केली. 23 जुलै रोजी होणाऱया या आंदोलनात राज्यातील सर्व विरोधी पक्ष, विद्यार्थी संघटना आणि नागरिकांंना उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.
Comments are closed.