एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू,अजितदादांची जयंती अन् देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमि
मराठी on Ajit Pawar Birth Anniversary : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची आज जयंती आहे. बारामती येथे 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातात अजित पवार (Ajit Pawar) यांचं निधन झालं. त्यानंतर आज त्यांची पहिली जयंती आहे. अशातच ज्या ठिकाणी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्या ठिकाणी पवार कुटुंबीयांनी भेट दिली आहे. एकीकडे अजित पवार यांच्या पहिल्या जयंती च्या फायद्यासाठी राज्याच्या राजकारण शोककळापसरली आहे. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (देवेंद्र फडणवीस) यांचा देखील वाढदिवस आहे. या प्रसंगावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष पोस्ट करत एका डोळ्यांत आनंद आणि एका डोळ्यांत अश्रू असल्याची भावना व्यक्त केली आहे.
मराठी : नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
आजचा 22 जुलैचा दिवस हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचा आनंद आणि त्याचवेळी महायुतीचे एक शिल्पकार, अजित पवार यांच्या उदास करणाऱ्या स्मृती घेऊन आलेला आहे. एका डोळ्यांत आनंद आणि एका डोळ्यांत अश्रू असा हा दिवस आहे. अजितदादांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. दादांची जागा कोणीही भरून काढणे शक्य नाही. मात्र दादांच्याच कार्यपथावरून वाटचाल करताना, सुखी-संपन्न महाराष्ट्र घडविण्याची दादांची इच्छा पूर्ण करण्यास उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना बळ मिळो, अशा सदिच्छा मी देतो.
कार्यकर्ते कसे सांभाळावेत, वक्तशीर कसे असावे, दिवसातला प्रत्येक क्षण कामात कसा घालवावा आणि त्याचवेळी प्रशासनावरही पकड ठेवावी, अशा अनेक बाबींचा धडा अजित पवार यांनी घालून दिला आहे. अर्थमंत्री म्हणून त्यांनी महायुतीच्या सर्व वचनांची पूर्तता अर्थसंकल्पातून केली होती. शेतीचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, सहकारातील समस्या यांचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. आम्ही एकत्रितरित्या महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक प्रगतीची स्वप्ने पाहिली होती. परंतु काळाने त्यांच्यावर अचानक घाला घातला. दादांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल. दिवस येतील-जातील, कालचक्र फिरत राहील, दादांच्या स्मृतींचा सुगंध सदैव दरवळत राहील..
मराठी on Devendra Fadnavis Birthday : राजकारणातील चालते-बोलते विद्यापीठ, कर्तृत्व आणि दातृत्वाचे महामेरू
दुवासरीकडे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील वाढदिवस आहे. या प्रसंगावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष पोस्ट करत देवेंद्र फडणवीस यांनाहे शुभेच्छा दिल्या आहे. यात एकनाथ शिंदे म्हणाले च्याबुद्धिमान, अभ्यासू आणि अष्टपैलू नेतृत्व, राजकारणातील चालते-बोलते विद्यापीठ, विकासाची आधुनिक दृष्टी असलेले लोकनेते, कर्तृत्व आणि दातृत्वाचे महामेरू अशी ख्याती असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि परममित्र देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
मराठी : शेक्सपिअर म्हणतो, ‘नावात काय आहे?’, पण मी म्हणतो, ‘देवेंद्र! बस नाम ही काफी है!
शेक्सपिअर म्हणतो, ‘नावात काय आहे?’, पण मी म्हणतो, ‘देवेंद्र! बस नाम ही काफी है ! ते महाराष्ट्राच्या राजकारणातले ‘बिग डी’ आहेत. हा ‘डी’ डिव्होशन, डेडिकेशन, डीटर्मिनेशन, डिसिप्लिन आणि डेअरिंगचाही आहे. ते कधी ‘एआय’च्या भरवशावर राहत नाहीत, कारण त्यांच्याकडे ‘एनआय’ म्हणजेच नॅचरल इंटेलिजन्स आहे.
ते जेवढे कायद्याचे पक्के आहेत, तेवढेच वायद्याचेही. देवेंद्रजींच्या भक्कम निर्धाराला मेहनतीची जोड आहे. ते सावजीसारखे तिखट आणि नागपुरी संत्र्यासारखे गोड आहे. देवेंद्रजी म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाची धगधगती ज्वाला आहेत. अशा अष्टपैलू, संवेदनशील आणि निष्कलंक नेत्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्यच. त्यांच्यासारखा अहोरात्र काम करणारा, महाराष्ट्राच्या जनतेशी नाळ जोडलेला नेता राज्याला मिळणे हे आपले भाग्य आहे.
‘वाढदिवस’ या शब्दात केवळ वय वाढणे हा अर्थ अपेक्षित असतो, परंतु देवेंद्रजींच्या बाबतीत मात्र प्रत्येक वर्ष, प्रत्येक दिवस हा त्यांची किर्ती आणि कर्तृत्व वाढवणारा ठरलेला आहे आणि यापुढेही ठरणार आहे.
महाराष्ट्राच्या मातीची सेवा करण्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो, आरोग्याची उत्तम साथ मिळो, त्यांच्या कर्तृत्वाचा सुवास सदैव दरवळत राहो, त्यांच्या राजकीय यशाचा आलेख सतत उंचावत राहो आणि किर्तीचा वेलू गगनावर चढो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
त्यांच्या भावी राजकीय प्रवासासाठी आणि निरोगी दीर्घायुष्यासाठी उदंड शुभेच्छा…
इतर महत्वाच्या बातम्या
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Comments are closed.