‘आज त्यांचा पहिला हा वाढदिवस ज्यावेळी आम्हाला त्यांना भेटता येणार नाही…’, अजित पवारांच्या जयं
बारामती : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची आज जयंती आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान येथील अजित पवार (Ajit Pawar) यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, वाढदिवसाला ते यायचे आम्ही सर्वजण जमायचो, आज त्यांचा पहिला हा वाढदिवस आहे की, आम्हाला त्यांना भेटता येणार नाही. आज देखील या दुर्दैवी घटनेवर विश्वास बसत नाहीत. माझा वाढदिवस असताना ते मला फोन करायचे त्यांचा वाढदिवस असताना मी त्यांना एखादा मेसेज करायचं कारण ते कामात एवढे व्यस्त असायचे की, फोन उचलतील नाही, उचलतील सांगता येत नव्हतं. जर ते आजीकडे वगैरे आले, भेटले, तर मग मी त्यांना भेटून शुभेच्छा द्यायचो. सुरुवातीचा काळ फार अवघड गेला, कोणाला विश्वास बसला नाही की, असं काहीतरी झालं आहे. विमानाच्या अपघाताची घटना घडली तेव्हा मी बारामतीत होतो, दहा मिनिटात मी विमानतळावर पोहोचलो. सर्व पाहिल्यावर मनाला वेदना झाल्या. दादा आपल्यात आता राहिले नाहीत यावर आजही कोणाला विश्वास बसत नाही असंही युगेंद्र पवार (Yugendra Pawar) म्हणालेत.
Yugendra Pawar: पुढच्या पंचवीस-पन्नास वर्षाचा विकास डोळ्यासमोर ठेवून…
तर बारामतीत त्यांनी एवढी काम केली की, पुढच्या पंचवीस-पन्नास वर्षाचा विकास डोळ्यासमोर ठेवून पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत आलेत. बारामतीकरांना दादांची खूप कमतरता जाणवत आहे. लोकांना असं वाटतं की बारामतीकर आता पोरके झालेत. दादा अजून काही वर्ष पाहिजे होते. ही लोकांची भावना आहे. माझे काका गेलेत माझ्या आयुष्यात माझे एकच काका होते, आणि ते गेले. त्यांच्याकडून मला फार शिकायला मिळायचं, लहानपणापासून ते आतापर्यंत कुटुंब म्हणून आम्ही नेहमी एकत्र असायचो. वेळोवेळी ते मार्गदर्शन करायचे. त्यांच्यात अनेक गुण होते, फक्त मी नाही तर महाराष्ट्र आणि देशातील जनतेला ते शिकण्यासारखे असे ते गुण होते. महाराष्ट्राच्या जनतेने एक नेता गमवला, माझे काका गेले, अशा भावना युगेंद्र पवारांनी व्यक्त केल्या.(Yugendra Pawar)
Yugendra Pawar: सध्याची परिस्थिती खूप गंभीर
सध्याची परिस्थिती खूप गंभीर आहे. काल पण सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, शरद पवार, अरविंद केजरीवाल दिल्लीला जंतरमंतरवर गेले.
राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांच्या घराच्या बाहेर आंदोलन केलं. ज्या पद्धतीने हे सरकार विद्यार्थ्यांच्या विरोधात वागत आहे, हे खूप चुकीच आहे. लोकांना अजिबात ते आवडलं नाही. विद्यार्थी त्यांच्या हक्कांसाठी आंदोलन करत असताना जर त्यांना तुम्ही मारत असाल त्यांच्यावरती अश्रू धुराच्या नळकांड्या टाकत असाल, तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो. हे जर आता थांबलं नाही तर आंदोलन देशभरात पसरायला वेळ लागणार नाही, असंही युगेंद्र पवार म्हणाले आहेत.
Yugendra Pawar: विलीनीकरण दादांची शेवटची इच्छा
विलीनीकरण दादांची शेवटची इच्छा होती. ती सगळ्यांचीच इच्छा होती. सर्व नेतृत्व दादांकडे जाणार होतं. अनेक बैठका झाल्या आहेत हे सर्व ठरलं होतं. पक्ष दादांकडे जाणार होता. पुढचे वीस पंचवीस वर्ष दादा सहज आपल्या पक्षाचे नेतृत्व करणार होते. पण अचानक असं झाल्यामुळे या सर्व चर्चा तिथे थांबल्या. आता काय होईल काय होणार हे मला सांगता येणार नाहीत. मी कार्यकर्ता म्हणून इथे काम करत आहे. चर्चा चालू असेल तर ती वरिष्ठ पातळीवर चालू असेल. पुढे काय होईल मला तरी सांगता येणार नाही. कुटुंब म्हणून आमची माझी इच्छा जरी असली तरी आम्ही भेटल्यावर राजकीय विषय कधी घेत नाही, राजकारणाबद्दल आम्ही एकमेकांशी बोलत नाही. कुटुंब म्हणून आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा एखाद्या लग्नात भेटतो साखरपुड्याला भेटतो. पुढच्या आठवड्यात पार्थ दादाचा पण साखरपुडा आहे, आम्ही सगळे एकत्र तुम्हाला दिसणारच आहे, साहेब पण तिथे असतील, सगळेजण एकत्र असतील पण तिथे भेटल्यावर आनंदाचा क्षण असतो, कोणाचं तरी लग्न होत असतं, त्यात आम्ही राजकारण किंवा इतर विषय बोलत नाही अशी प्रतिक्रिया विलीनीकरणाबाबत युगेंद्र पवारांनी दिली आहे.
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Comments are closed.