ध्येयासाठी बलिदान देण्याचा उल्लेख, चॅटसाठी ॲप्लिकेशन्सच्या लिंक्स; CJPच्या आंदोलनातील ‘ते’ मेसे

CJP निषेध बातम्या नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर मंगळवारी ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलना हिंसक वळण लागल्याचे चित्र बघायला मिळालं. तर सीजेपीच्या आंदोलनांसंदर्भात (CJP Protest) आतापर्यंत एकूण 10 एफआयआर (FIR) दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. अशातचसीजेपीच्या ‘संसद चलो’ मोर्चातील सहभागींमध्ये झालेल्या कथित चॅट संदेशांची दिल्ली पोलीस (Delhi Police) तपासणी करत आहे. यातील काही संभाषणांमधून संभाव्य इंटरनेट बंदच्या काळात संपर्क कायम ठेवण्याच्या तयारीचे संकेत मिळत आहेत, तर काहींमधून या ध्येयासाठी प्राणांचे बलिदान देण्याचा उल्लेख केला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस सूत्रांनी सांगितले की, कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी तपास अधिकारी चॅट्सची सत्यता आणि त्यात सामील असलेल्या व्यक्तींच्या ओळखीची पडताळणी करत आहेत.

दरम्यानया कथित संदेशांचे विश्लेषण सीसीटीव्ही फुटेज, ड्रोन दृश्ये, मोबाईल फोन, व्हिडिओ आणि संघर्षाच्या तपासादरम्यान गोळा केलेल्या इतर इलेक्ट्रॉनिक पुराव्यांसोबत केले जात आहे. या संघर्षात 118 पोलीस कर्मचारी आणि सुमारे 70 आंदोलक जखमी झाले, तसेच 15-20 सरकारी वाहनांचे नुकसान झाले आहे.

CJP Protest News : इंटरनेट बंद असताना संवाद साधण्याबाबत चॅट्समध्ये कथितरित्या चर्चा

पीटीआयच्या वृत्तानुसार, काही कथित संदेशांमध्ये आंदोलनादरम्यान इंटरनेट सेवा खंडित झाल्यास संपर्कात राहण्याच्या पर्यायी मार्गांवर चर्चा करण्यात आली होती. “आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तुमच्या डिव्हाइसमध्ये नेटवर्क मिळणार नाही. पोलिसांनी मागच्या वेळीही नेटवर्क जॅमर वापरले होते आणि यावेळीही ते तसे करू शकतात. किंबहुनातुम्ही ज्या गटासोबत आला आहात त्यांच्याशी संपर्कात राहणे खूप महत्त्वाचे आहे,” असे एका कथित संदेशात म्हटले होते. तपासकर्त्यांनी सांगितले की, सहभागींनी अशा ॲप्लिकेशन्सच्या लिंक्स देखील शेअर केल्या होत्या, ज्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या अनुपस्थितीत ब्लूटूथ सिग्नल वापरून काम करू शकत होत्या. “आंदोलनाच्या ठिकाणी प्रवेश करण्यापूर्वी तुमच्या गटातील सर्वांनी एकच ॲप इन्स्टॉल केले आहे आणि ते आधीच कनेक्टेड आहेत याची खात्री करा,” असे आणखी एका कथित संदेशात म्हटले होते. पोलिसांनी सांगितले की ते चॅट्समध्ये नमूद केलेल्या ॲप्लिकेशन्सची तपासणी करत आहेत आणि निष्कर्षांनुसार कारवाई केली जाईल.

Delhi Police : सीजेपीच्या आंदोलनांसंदर्भात आतापर्यंत एकूण 10 एफआयआर दाखल

दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनांसंदर्भात आतापर्यंत एकूण 10 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन मध्ये 4 एफआयआर, सीपी पोलीस स्टेशन – 3 एफआयआर, तर मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये 1 एफआयआर आणि बारखंबा रोड पोलीस स्टेशनमध्ये 1 एफआयआरसह कर्तव्य पथ पोलीस स्टेशनमध्ये 1 एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे एफआयआर आंदोलनादरम्यान घडलेल्या आणि कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित विविध घटनांच्या संदर्भात दाखल करण्यात आले आहेत. सध्या या प्रकरणांचा तपास सुरू आहे.

Comments are closed.