मुलामुळे दोघांच्या शारीरिक संबंधांमध्ये अडथळा; आईच्या प्रियकराने वरवंटा मारला, चिमुकल्याने जीव
अंबरनाथ क्राईम न्यूज: अंबरनाथमध्ये सात वर्षांच्या चिमुकल्याच्या हत्येची धक्कादायक घटना (Ambernath News) समोर आली आहे. आईच्या प्रियकराने मुलाच्या डोक्यावर वरवंट्याने मारा करून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अंबरनाथ पश्चिमेतील लादी नाका परिसरात राहणारी सकीना कुरेशी आपल्या सात वर्षांचा मुलगा हुसनैन कुरेशी सह राहत होती. प्राथमिक माहितीनुसार, तिचे विकास सिंग याच्यासोबत प्रेम संबंध होते. पोलीस तपासानुसार, मुलामुळे दोघांच्या शारीरिक संबंधांमध्ये अडथळा येत असल्याने विकास सिंग याने हुसनैनला मारण्याचा प्लॅन केला.
नेमकं काय घडलं? (Thane Ambernath Crime Marathi News)
विकास सिंग याने प्लॅननुसार मुलाच्या डोक्याचा घाव करून मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या हुसनैनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच पहाटे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी विकास सिंगला अटक केली. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, घटनेमागील आणखी कारण आणि इतर पैलूंचा तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना का देण्यात आली नाही आणि मुलाची आई सकीना कुरेशी हिने घटनाक्रम लपवण्याचा प्रयत्न केला का, याचाही तपास पोलीस करत आहेत. या अमानुष घटनेने अंबरनाथ मध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास अंबरनाथ पोलीस करत आहेत.
ठाण्यातही हादरवणारी घटना- (Thane Crime News)
ठाण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराजा हॉटेल लॉज या ठिकाणी प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याने एकच खळबळ (Thane Crime Marathi News) उडाली आहे. उशीच्या सहाय्याने तोंड दाबून प्रियकराने प्रेयसीला संपवल्याचं समोर आलं आहे. नंदकिशोर गाडेकर वय 27 वर्षे हा विष्णू नगर डोंबिवलीचा रहिवासी असून आरोपीला ठाणे नगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर खून करण्यात आलेल्या तरुणीचे नाव संध्या म्हस्के वय वर्षे 23 असून ती भांडुपची रहिवासी आहे. दोघांचे गेल्या 4 वर्षांपासून प्रेम संबंध होते, मात्र हत्या करण्यामागचे कारण ठाणे नगर पोलीस तपास करत आहे. (Thane Crime News)
मागील काही वर्षांपासून तिचे डोंबिवली येथे राहणाऱ्या नंदकिशोर गांडेकर याच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. गांडेकर हा देखील विवाहित आहे. काल दुपारी ते जांभळीनाका येथील महाराजा लॉजवर आले होते. काल रात्री गांडेकर हा तेथून निघून गेला. परंतु संध्या तिथेच होती. त्यामुळे लॉजवरील कर्मचाऱ्याने पाहणी केली असता, संध्या ही बेशुद्ध आढळून आली. या घटनेची माहिती लॉज व्यवस्थापकांनी ठाणेनगर पोलिसांना दिल्यानंतर पोलिस पथक दाखल झाले. संध्या हिचा या घटनेत मृत्यू झाला होता. दरम्यान, गांडेकर हा जांभळीनाका येथे असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. त्यांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याची चौकशी केली असता, संध्या हिचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून ही हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली. याप्रकरणी लॉज व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे नंदकिशोर गांडेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती ठाणे पोलिसांना दिली. (Thane Crime News)
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
ही बातमीही वाचा:
Comments are closed.