प्रधानांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, ठाकरे आक्रमक, शिवाजी पार्कवर एकत्रीत राष्ट्रगीत गायन करणार
आदित्य ठाकरे: नीट पेपरफुटी प्रकणावरुन दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांनी विविध संघटनांनी पाठिंबा दिली आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाने देखील या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी दिल्लीला जात जंतर मंतरवर सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. तुमचं सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे असे आदित्य ठाकरे म्हणाले.
सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. तुमचं सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे असे आदित्य ठाकरे म्हणाले. येत्या 24 तारखेला चार वाजता शिवाजी पार्क येथे एकत्र राष्ट्रगीत गायन करणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. मुंबई पोलिसांमध्ये अजून संवेदनशीलपणा आहे. दिल्लीप्रमाणे मुंबई पोलिसांनी लाठी चार्ज केला नाही असेही आदित्य ठाकरे म्हणाले. 24 तारखेला कुठल्याही पक्षाच्या झेंड्याखाली नाही तर भारताच्या झेंड्याखाली पुन्हा एकत्र येऊया आणि राष्ट्रगान गाऊया असे आवाहन असे आदित्य ठाकरे यांनी तरुणांना केलं आहे.
फक्त एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल : उद्धव ठाकरे
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी काँकरोच जनता पार्टीचं दिल्लीतल्या जंतरमंतरवर आंदोलन (CJP Protest Delhi Jantar Mantar) सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी अभिजीत दीपके तुम्ही दिल्लीत आंदोलन करा, माझा प्रयत्न हे आंदोलन देशभरात कायम राहिलं पाहिजे. महाराष्ट्रात आम्ही सुरुवात केली आहे, महाराष्ट्र तुमच्यासोबत उभा आहे. महाराष्ट्राचा तरुण नेतृत्व करतोय, याचा अभिमान आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. अभिजीत दीपके यानं एक ठिणगी पेटवली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जीव गमावले त्यांचे फोटो इथं लावले आहेत. स्वतंत्र देशात विद्यार्थी पेपरफुटीमुळे आत्महत्या करत आहेत, आपल्याला त्या विद्यार्थ्यांचं स्मरण ठेवावं लागेल. निवडणुकीला तीन वर्ष आहेत, खूप वेळ आहे, आता आपलं युद्ध सुरु झालं आहे. फक्त एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल. जोपर्यंत सरकार बदलणार नाही, तोपर्यंत आपल्या आयुष्यात काही बदल होणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
दिल्लीतील आंदोलनाला देशभरातून पाठिंबा
राजधानी दिल्लीत (Delhi) विद्यार्थ्यांनी नीट पेपरफुटीवरुन उभारलेल्या आंदोलनास देशभरातून पाठिंबा मिळत असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातही आंदोलनाची धग पसरल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, सोशल मीडियातूनही तरुणाई व्यक्त होत असून दिल्लीतील आंदोलनास (CJP Protest)आपला पाठिंबा दिला जात आहे. मात्र, दिल्ली पोलिसांकडून (Police) आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पोलिसांनी डिजिटल पेट्रोलिंग सुरू केल्याचं दिसून येत आहे. राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या सीजेपी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी यावेळी विशेष तयारी केली होती. दिल्लीतील मोठ्या आंदोलनांचा अनुभव लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी तब्बल 14 दिवस सोशल मीडिया मॉनिटरिंग, गुप्त माहिती संकलन आणि प्रत्यक्ष मैदानावरील विशेष नियोजनाच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात ठेवली. राज्यभरात सीजेपीच्या समर्थनार्थ एकूण 98 ठिकाणी आंदोलने झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
14 दिवस सोशल मीडियावर विशेष नजर
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, संभाव्य आंदोलनांची शक्यता लक्षात घेऊन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विशेष डिजिटल पेट्रोलिंग करण्यात आले. आंदोलनाशी संबंधित हॅशटॅग, कीवर्ड्स तसेच सातत्याने पोस्ट करणाऱ्या अकाउंट्सवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या आणि त्याचा प्रचार करणाऱ्या व्यक्तींच्या ऑनलाइन हालचालींचेही विश्लेषण करण्यात आले. या डिजिटल मॉनिटरिंगमुळे संभाव्य गर्दी, आंदोलनाची ठिकाणे आणि आयोजकांविषयी महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Comments are closed.