आताच मारुन टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?

Bharat Banait from Nagpur: दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत “मारो मारो सर मारो मार डालो” म्हणणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांची जगभरात नाचक्की झाली. या मारहाणीत व्हायरल झालेला तरुण नागपूरचा असून भारत बानाईत असं त्याचं नाव आहे. त्याने आपल्या भावना एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केल्या. मी यांना घाबरत नाही, राजीनामा होत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. मी हिंदू असून इथंच दफन होऊन मरून जाईन असा निर्धार त्याने व्यक्त केला. भारतसोबत काय घडलं हे त्यानं सविस्तर सांगितलं आहे.

“मारा सर, मारा, मारा,” माझी भावना व्यक्त केली

भारत म्हणाला की,  पोलीसवाले आरएएफवाल्यांनी मला मारायला सुरुवात केली.10-15 जण पहिल्यांदा मारत होते. मी म्हणालो, “मारो मारो सर मारो मार डालो” ही माझी भावना तिथे व्यक्त केली. मी काही चुकीच केलं नाही, जर असेल तर तुम्ही विव्हिजुअल दाखवा की मी चुकीचं काही केलं असेल? 25-30 लोकांनी मिळून मला मारलं आणि मग कॅमेरेवाले स्वतः आले आणि ताब्यात घेतलं. मला मीडिया वाल्यांनी वाचवलं नाहीतर 25-30 लोक मिळून मला तिथं मारत होते.” एका आरएएफवाल्यानी मला शिवी दिल्याचेही तो म्हणाला.

मी शिक्षणासाठी लढाई लढायला आलोय

भारतने सांगितले की मी शिक्षणासाठी लढाई लढायला आलो आहे. महागाई हा असा विषय आहे की ज्यामुळे अत्यंत महाग स्टडीज झाली आहे. 15-20 हजार कमवणारा व्यक्ती दीड-दोन लाखाची फीज आपल्या शाळेची मुलांच्या कशी भरत असेल? सरकारी शाळांची दुरावस्था आहे किती दुरावस्ता आहे. मरेन इथंच, दफन होऊन जाईन मी हिंदू असून दफन होऊन जाईन, पण राजीनामा होत नाही तोपर्यंत जाणार नसल्याचा निर्धार त्याने व्यक्त केला.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.