तुमचं नाटक, व्हिडीओ बस्स झाले; तुम्ही धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या नाहीतर…, संदीप देशपा

दिल्ली: नीट परीक्षा पेपर लिक प्रकरणी कॉकरोच जनता पार्टी दिल्लीमध्ये आंदोलन करत आहे. या आंदोलनाची धग देशभरात जाणवू लागली आहे. महाराष्ट्रासह देशभरात आंदोलनं केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींनी (PM Modi) एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये सगळ्यांचे आभार मानले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शुक्रवारी रात्री उशिरा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओनंतर रात्री दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. सोनम वांगचूक यांनी पहाटे उपोषण सोडलं तर दुसरीकडे अभिजीत दिपके यांनी आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका घेतली. आता पंतप्रधान मोदींनी एक व्हिडीओ शेअर करून सर्व तरुण आंदोलकांचे आभार मानले आहे. तर मोदींच्या या व्हिडीओवरती मनसे नेते संदीप देशपांडे(Sandeep Deshpande) यांनी टीका केला केली.

देशपांडे (Sandeep Deshpande)  यांनी पोस्ट करत म्हटलं आहे की, पंतप्रधान महोदय तुमची नाटक आणि नाटकीय व्हिडिओ बस्स झाले, तुम्ही प्रधानांचा राजीनामा घ्या, नाहीतर जनता पंतप्रधानांचा राजीनामा घेईल. धर्म वाचवता वाचवता धर्मेंद्र वाचवायला कुठे निघालात, अशा शब्दात देशपांडेंनी टीका केली आहे.(Sandeep Deshpande)

Sandeep Deshpande on PM Modi:  दुसऱ्या व्हिडीओत काय म्हणालेले मोदी?

“धन्यवाद मित्रांनो, काल रात्री उशिरा तुमच्यासोबत भेटण्याची संधी मिळाली. मी जो काही व्हिडीओ शेअर केला होता, त्या व्हिडीओला तुम्ही प्रतिसाद दिला, जो काही सल्ला दिला आहे. सकारात्मक सल्ले दिले, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुमचं प्रेम हे असंच कायम असो, आपलं नातं आणखी सक्रियपणे जोडलं जाईल” असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी तरुणाईंचे आभार मानले.

संदीप देशपांडे वर पीएम मोदी:  पेपरफुटी प्रकरणी कारवाईचा इशारा

पेपरफुटीप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा करण्याविषयी नरेंद्र मोदींनी गुरुवारी शेअर केलेल्या व्हिडीओतून जाहीर केलेल्या उपाययोजनांना मिळालेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. जवळपास तीन मिनिटांच्या व्हिडिओ संदेशात पंतप्रधानांनी म्हणाले की, सरकार चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात प्रस्तावित विधेयक लवकरात लवकर संसदेत मंजूर करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. परीक्षेचे पेपर फुटण्याच्या प्रकारांना गंभीर समस्या असल्याचे सांगत पंतप्रधान म्हणाले, की अशा घटनांमुळे लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. पेपर फुटीच्या प्रकरणांचा अधिक प्रभावीपणे निपटारा केला जाईल, याची खात्री करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

हेदेखील वाचा

Comments are closed.