CWG 2026 – ऋषिकांत सिंगने इतिहास रचला; नवा विक्रम, ६० किलो वजनी गटात रौप्यपदक
हिंदुस्थानचा वेटलिफ्टेर चणंबम ऋषिकांत सिंग याने ग्लास्गो येथील Commonwealth Games 2026 मधील पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात ऐतिहासिक कामगिरी करत रौप्य पदक पटकावले. त्याने स्नॅच प्रकारात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा नवीन विक्रम नोंदवत एकूण 264 किलो वजन उचलले. मलेशियाच्या मोहम्मद अनिक बिन कसदानने एकूण 273 किलो वजन उचलत सुवर्णपदक जिंकले, तर केनियाच्या जोशुआ अमुंगा मोबोयाने (260 किलो) कांस्य पदक आपल्या नावावर केले.
मनिपूरच्या इम्फाळ पश्चिम येथील रहिवासी असलेल्या ऋषिकान्तचे दुसऱ्यांया या स्पर्धेत भाग घेतला असून त्याने याआधी 2022 च्या बर्मिंगहॅम स्पर्धेत 55 किलो गटात सहभाग घेतला होता. वजनी गटांमधील बदलांनंतर तो 60 किलो गटात खेळू लागला. यापूर्वी त्याने 2025 च्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून या स्पर्धेसाठी पात्रता निश्चित केली होती.
वैभवाचा पाठलाग करत इतिहास रचला!
पदक; आणि काही क्षण आधी आणि नंतर ऋषिकांत सिंगने पुरुषांच्या 60kgs वेटलिफ्टिंग स्पर्धेत स्नॅचमध्ये CWG विक्रम मोडला! 🙌🏽
चला #Cheer4Bharat#WeAreTeamIndia | #TogetherWeDream pic.twitter.com/UM74txbL3k
— टीम इंडिया (@WeAreTeamIndia) 26 जुलै 2026
Comments are closed.