डोंगराचा मलबा शेतात; 12 शेतकऱ्यांचे नुकसान
डहाणू तालुक्यातील शेणसरी गांगोडी ग्रामपंचायत हद्दीतील गांगोडी येथे खचलेला डोंगर सुमारे बारा शेतकऱ्यांच्या शेतात घुसला. दगड, माती आणि मोठमोठी झाडे थेट शेतात आल्याने पिके, शेतीचे बांध वाहून गेले. यामुळे बळीराजाच्या कष्टाचा अक्षरशः चिखल झाला. शेती हेच उपजीविकेचे साधन असल्याने आता वर्षभर खायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिकांसह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
अनेक शेतकऱ्यांच्या शेताचे मोठे नुकसान झाले आहे. डोंगर कोसळून दगड, धोंडे, झाडांसह मातीचा मलबा शेतात आलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे केले जात असून शासनाने मदतीचा हात द्यावा.
— साधना बोरसा, सरपंच.
Comments are closed.