देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत: ज्याप्रमाणे 1991 मध्ये तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी अर्थखात्याची धुरा मनमोहन सिंग यांच्याकडे देऊन आर्थिक क्रांती घडवून आणली त्याप्रमाणे पंतप्रधान मोदी (पीएम मोदी) देशातील शिक्षणपद्धती सुधारण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाहेरची व्यक्ती या पदावर बसवावी. नंदन निलकेणी (Nandan Nilekani) यांना शिक्षणमंत्री पद द्यावे. गेलाबाजार ज्या देवेंद्र फडणवीस यांचा विचार करताच आहात, ते फडणवीस योग्य व्यक्ती आहेत. त्यांनाच देशाचं शिक्षणमंत्री केलं जाईल, हे मी ठामपणे सांगतो, ते कितीही नाही म्हणाले तरी, तेच पुढचे शिक्षणमंत्री आहेत, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले. ते सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कोणत्याही परिस्थितीत दिल्लीत जाणार असल्याचा दावा केला. (Is Devendra Fadnavis next union education minister of country?)
देवेंद्र फडणवीस हे मी महाराष्ट्रातच राहणार, असे सांगत असले तरी त्यांनी कुठे राहायचं, ही गोष्ट त्यांच्या हातात नाही. 2022 मध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारणं त्यांच्या हातात नव्हतं ना? जेव्हा कमिशनरचा हवालदार केला, तेव्हा मोदी-शाहांनी आदेश दिले होते. या गोष्टी त्यांच्या हातातच नाहीत. भारतीय जनता पक्षात स्वाभिमान आणि मेरिट आहे कुठे? या देशाचा शिक्षणमंत्री मेरिटवर करायचा असेल तर मोदींच्या मनात या क्षणी देवेंद्र फडणवीस यांचेच नाव सुरु आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी देशात सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित शिक्षणपद्धती असल्याचे म्हटले. गरिबांची मुलं संघाच्या या बोगस शिक्षण पद्धतीत शिकत आहेत. राजकीय नेते आणि मंत्र्यांची बहुतांश मुलं ही परदेशात शिक्षण घेत आहेत. त्यांना इकडे शिकायला लावा, असे संजय राऊत यांनी म्हटले. गेल्या दहा वर्षात देशात बोगस शिक्षणपद्धती संघाच्या माध्यमातून निर्माण झाली आहे. पंडित नेहरुंच्या काळापासून आपली शिक्षणपद्धती आधुनिक होती. त्याचं वाटोळं गेल्या दहा वर्षात झालं. नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंह हे आधुनिक विचारसरणीचे लोक होते. ही आधुनिकता मारुन तुम्ही भारताला पुराणकालीन आणि महाभारत काळातील शिक्षणपद्धतीत नेलं, याबद्दल भाजपने माफी मागितली पाहिजे. या देशात तंत्रज्ञानाचं युग काँग्रेसने आणलं, त्याकाळी नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग हे पंतप्रधान सुशिक्षित होते, त्यांना शिक्षणाविषयी आस्था होती. देश आधुनिकीकरणाच्या मार्गाने जावा, नव्या पिढीने हे आत्मसात करावं, त्यासाठी या देशात आयआयटी, आयआयएम या संस्थांची स्थापना झाली. तुम्ही काय स्थापन केलं गोशाळा. तुम्ही मुलांना पकोडे तळायला सांगता, चहा विकायला लावता, गोशाळा स्थापन करुन सरकारी अनुदानावर मुलांना गोमुत्र, शेण गोळा करायला सांगताय. या सगळ्यात निलकेणी काय करणार? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
आणखी वाचा
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Comments are closed.