सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट
मुंबई क्राईम न्यूज : मुंबईच्या अंधेरी पूर्वेत एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बांगलादेशी नागरिकांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. भारतात अवैधरीत्या दाखल होऊन मुंबई शहरात राहणारे सात बांगलादेशी तृतीयपंथींना अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिसांचा एटीसी पथकाने ही कारवाई केली आहे. घोडबंदर रोडवर फाउंटन हॉटेल परिसरात सापळा रचून सात तृतीयपंथींना अटक केली आहे.
भारतात दाखल होऊन मुंबई शहरात सेक्स रॅकेट चालवत होते
हे सर्व तृतीयपंथी बांगलादेशी असून अवैधरित्या भारतात दाखल होऊन मुंबई शहरात सेक्स रॅकेट चालवत होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांचा एटीसी पथकाला यांच्या बद्दल गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर एमआयडीसीचे एटीसी पथकाने घोडबंदर रोडवर फाउंटन हॉटेल परिसरात दोन दिवस पाळत ठेवून या आरोपींना हॉटेल मधून अटक केली आहे. अटक आरोपी तृतीयपंथी चे नाव मो.जिहाद मो. मोहम्मिल अली,वय 22 वर्षे,पिहू इस्लाम अशीर उद्दीन वय 23 वर्षे,मो. हमीदूर मो. बेलाल रहमान वय 18 वर्षे.मो. जाहेदुल हक मो. शुकूर अली वय 23 वर्षे.मो. जॉनी बाबू मो. शाहिदूल इस्लाम वय 18 वर्षे,आकी मो. नागरअली मोनी वय 21 वर्षे,मो. मुशरफ फैदुश खान, वय 22 वर्षे आहे.
आरोपींकडून एमआयडीसी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बांगलादेशी पुरावा जप्त केला
एमआयडीसी पोलिसांच्या तपासात अटक आरोपीच्या मोबाईलमध्ये बांगलादेशी क्रमांक व मेसेंजर संपर्क केल्याचे दिसून आले आहे. ते बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले असून या आरोपींकडून एमआयडीसी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बांगलादेशी पुरावा सुद्धा जप्त केला आहे. या तृतीयपंथींच्या टोळीमध्ये मुंबई शहरात आणखी मोठ्या संख्यांमध्ये बांगलादेशी तृतीयपंथी दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
मागील काही महिन्यांपूर्वीच मुंबईत अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली होती. भारतात अवैधरित्या (Crime News) आराम असलेल्या बांगलादेशी नागरिककांविरोधात मुंबईच्या वर्सोवा पोलिसांni मोठी कारवाई केली होती. वर्सोवा पोलिसांकडून अंधेरी (Andheri) पश्चिम यारी रोड आणि माहीम परिसरात धाडी टाकून एकूण 21 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. हे सर्व बांगलादेशी नागरिक अवैधरित्या भारतात दाखल होऊन कोलकाता या राज्यातून थेट मुंबई शहरात दाखल झाले होते, अशी माहिती तपासात पुढे आली होती. अशातच आता पुन्हा मुंबईच्या अंधेरी पूर्वेत एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बांगलादेशी नागरिकांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. भारतात अवैधरीत्या दाखल होऊन मुंबई शहरात राहणारे सात बांगलादेशी तृतीयपंथींना अटक करण्यात आली आहे.
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Comments are closed.