झारखंड आंदोलकांचा निर्धार, दुसरी चर्चाही वाया, अभाविपचे कार्यकर्ते-राज्य पोलिसांमध्ये धुमश्चक्री 

झारखंडमधील प्रश्नपत्रिकाफुटी आणि शैक्षणिक गैरव्यवहार यांच्या विरोधात त्या राज्यातील विद्यार्थी संघटनांनी चालविलेले आंदोलन अधिकाधिक उग्र होत आहे. आंदोलनाच्या 16 दिवशी शनिवारी आंदोलकांनी राज्य सरकारशी केलेली दुसऱ्या फेरीतील चर्चाही असफल ठरली आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे नेते देवेंद्रनाथ महातो यांनी अनिश्चितकालीन उपोषण आरंभलेले असून शनिवारी अकराव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती देण्यात आली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा या आंदोलनात सक्रीय सहभाग प्रथमपासून असून या संघटनेचे सहस्रावधी कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित आहेत. रांची येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असूनही आंदोलनाचे स्थान न सोडण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. झारखंडच्या शिक्षणमंत्र्यांनी पद सोडावे अशी आंदोलकांची मागणी आहे. ती अद्याप मान्य न झाल्याने उपोषण आणि आंदोलन होतच आहे.

आंदोलकांनी अत्यंत प्रभावी शब्दांमध्ये आणि अर्थपूर्ण अशा घोषणा बनविल्या असून त्या राज्यात सर्वत्र लोकप्रिय होत असल्याचे दिसून येते. ‘गाव छोड नही…जंगल छोडत नही…हमार माटी छोडत नाही…लडाई छोडत नही,’ हे गाणे विशेषत्वाने लोकप्रिय होत आहे. रांची येथील जयपालसिंग मुंडा स्टेडियममध्ये हे आंदोलन होत असून हे मैदान आंदोलकांनी भरुन गेल्याचे दिसून येत आहे.

भ्रष्टाचार, कुव्यवस्थापन

झारखंड येथील विद्यार्थी आंदोलन हे गेल्या अनेक वर्षांमधील भ्रष्टाचारासंबंधी विद्यार्थ्यांच्या मनात साचलेल्या संतापाच्या उद्रेकाच्या स्वरुपात होत आहे, असे अनेक तज्ञांचे मत आहे. झारखंडमध्ये प्रश्नपत्रिकाफुटीच्या अनेक घटना घडल्या. विद्यार्थ्यांनी वेळोवेळी या घटनांच्या विरोधात संघर्ष केला आहे. तथापि, प्रशासनाकडून त्यांच्याकडे पद्धतशील दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात असंतोष खदखदत होता. तो गेल्या काही दिवसांमध्ये उग्र आंदोलनाच्या माध्यमातून उफाळून आला आहे. आता राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष आहे.

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा

या आंदोलनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांशी विविध वृत्तसंस्थांच्या पत्रकारांनी संवाद साधला आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्यथा बोलून दाखविल्या आहेत. एका विद्यार्थ्याकडून प्रवेश मिळवून देण्यासाठी 15 लाख रुपये मागण्यात येतात. काही विद्यार्थिनी आई-वडिलांशी भांडून उच्च शिक्षणासाठी रांची येथे आल्या. गुणवान असूनही राज्य सरकारच्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे आमच्या स्वप्नांचा चुराडा झाला, अशी त्यांची व्यथा आहे. काही विद्यार्थिकी अनिश्चितकालीन उपोषण करीत आहेत.

अनेक परीक्षा रद्द

केवळ जीपीएससी नव्हे, तर गेल्या काही महिन्यांमध्ये झारखंडमध्ये झारखंड स्टाफ सिलेक्शन एक्झामिनेशन, पदवीपातळी परीक्षा, 11 वी ते 13 वी जेपीएससी परीक्षा आणि इतर अनेक नोकरी पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे आणि अन्य अनेक कारणांमुळे अचानक रद्द करण्यात आल्या. त्यामुळे या परीक्षांना बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांना नैराश्य आले. ते आता आंदोलनात सहभागी आहेत.

राहुल गांधी यांच्यावर भडीमार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर विद्यार्थ्यांनी त्यांच्या सोशल मिडिया पोस्टस्मधून प्रश्नांचा भडीमार चालविला आहे. नीट-युजी आणि जंतरमंतरवरील आंदोलन यांचे मुद्दे राहुल गांधी यांनी लोकसभेत उपस्थित केले. पण ज्या झारखंडमध्ये काँग्रेस सरकारमध्ये सहभागी आहे, त्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या आक्रोशाचा त्यांनी उल्लेखही केला नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या संतापाचा भडका उडाला आहे. परिणामी, राहुल गांधी यांचीही मोठीच कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.

10 ऑगस्टला विधानसभेवर मोर्चा

विद्यार्थ्यांनी आता उद्या, अर्थात सोमवारी 10 ऑगस्टला झारखंडच्या विधानसभेवर मोर्चा नेण्याचा कार्यक्रम निर्धारीत केला आहे. तो पर्यंत तोडगा काढण्यासाठी आंदोलकांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कालावधी दिला आहे. मात्र, तोपर्यंत समस्या सोडविण्याचे प्रयत्न करण्यात आले नाहीत आणि मोर्चा निघालाच, तर हिंसाचार होण्याची शक्यता व्यक्त होत असून, तसे झाल्यास स्थिती हाताबाहेर जाईल, असा इशाराही जाणकारांनी राज्य सरकारला दिला आहे.

उपोषणकर्ता रुग्णालयात

या आंदोलनात केवळ महातो नव्हे, तर किमान 15 विद्यार्थी उपोषण करीत आहेत. त्यांच्यापैकी एकाची प्रकृती उपोषणाच्या 12 व्या दिवशी अत्यंत खालावल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तथापि, त्याने उपोषण सोडण्यास नकार दिला आहे. आणखी काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली आहे.

झारखंड आंदोलन अधिक तीव्र

ड आंदोलनातील अनेक विद्यार्थ्यांचे अद्यापही अनिश्चितकालीन उपोषण सुरुच

ड आंदोलनस्थळी प्रचंड संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती, राज्य सरकार तणावग्रस्त

ड आंदोलक आणि राज्य सरकार यांच्यातील चर्चेच्या दोन फेऱ्या निर्णयाविना

ड उद्या सोमवारी आंदोलक विधानसभेवर मोर्चा काढणार, दिला अंतिम इशारा

Comments are closed.