मुंबईत दहीहंडीऐवजी रक्षाबंधनदिनी शासकीय सुट्टी
यंदाच्या वर्षी मुंबई शहर आणि उपनगरात गोपाळकाला (दहीहंडी) सणाऐवजी रक्षाबंधन सणाला शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला.
शनिवार, ५ सप्टेंबर रोजी गोपाळकाला आहे, तर रक्षाबंधन शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी आहे. गोपाळकाल्याऐवजी रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी असेल असे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
Comments are closed.