चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील गोसेखुर्द कालव्यात शाळकरी विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील रमाबाई आंबेडकर विद्यालयात 10वी मध्ये शिकणारा विद्यार्थी नैतिक विठ्ठल शेडमाके (15) हा आपल्या दोन मित्रांसोबत गोसेखुर्द कालव्याकडे आंघोळीसाठी गेला होता. मात्र नैतिक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचे लक्षात येताच सोबतचे दोन्ही मित्र घाबरून घरी परत आले. नैतिक घरी आलेला नाही म्हणून सर्वत्र शोधाशोध सुरू झाली मात्र थांगपत्ता लागला नाही. शेवटी मंगळवारी त्या दोन्ही मित्रांनी सत्य कहाणी सांगितल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली आहे. घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली. कालव्यातील पाण्याचा प्रवाह आणि परिस्थिती लक्षात घेता शोधमोहीम राबविण्यात येत असून, विद्यार्थी शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Comments are closed.