IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर! जाणून घ्या सविस्तर अपडेट

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात लवकरच एक टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेची चाहते बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. चाहत्यांची ही प्रतीक्षा संपवत अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने 3 सामन्यांच्या या टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. जरी ही मालिका अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड होस्ट करत असली, तरी सर्व सामने दिल्लीतच खेळवले जाणार आहेत. त्यामुळे युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) लवकरच पुन्हा एकदा भारतीय संघाच्या जर्सीमध्ये चाहत्यांना खेळताना दिसणार आहे.

भारतीय संघ (Indian cricket team) सध्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेची तयारी करत आहे. या कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाचा कोणताही मोठा सामना आयोजित नव्हता. त्यामुळे, टी-20 संघ तर जुलै महिन्यानंतर थेट 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2026) खेळणार होता, जिथे त्यांचे सामने 24 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. या स्पर्धेच्या तयारीसाठी कोणतीही मालिका उपलब्ध नव्हती, त्यामुळेच बीसीसीआयने अफगाणिस्तानविरुद्ध 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत खेळण्याची घोषणा केली आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले असून, तिन्ही सामने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जातील. पहिला सामना 13 सप्टेंबरला तर तिसरा टी-20 सामना 17 सप्टेंबरला खेळवला जाईल, जिथे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ खेळताना दिसेल. या मालिकेत 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी देखील खेळताना दिसणार आहे.

IND vs AFG मालिकेचे वेळापत्रक

पहिला टी-20 सामना 13 सप्टेंबर 2026 अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली

दुसरा टी-20 सामना 15 सप्टेंबर 2026 अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली

तिसरा टी-20 सामना 17 सप्टेंबर 2026 अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली

Comments are closed.