ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 6 विकेट्स घेणारा हसन महमूद कोण? ठरला ऑस्ट्रेलियात फिफर्स घेणारा पहिला बांगलादेशी!

बांगलादेशचा वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार असून पहिला सामना गुरूवारपासून (13 ऑगस्ट) डार्विन येथे खेळला जात आहे. यामध्ये बांगलादेशच्या हसन महमूदने विक्रमी सहा विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि कर्णधार पॅट कमिन्सचा हा निर्णय काहीसा चुकल्याचे लक्षात आले. कारण बांगलादेशच्या वेगासमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अडखळताना दिसले. यजमानांचा पहिला डाव अवघ्या 200 धावसंख्येच्या आतच संपुष्टात आला.

26 वर्षीय वेगवान गोलंदाज महमूदने 17 षटकांत 55 धावा देत 6 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तसेच त्याने तीन षटके निर्धाव टाकली. त्याने ट्रेव्हिस हेड, जेक वेदरॉल्ड, स्टीव्ह स्मिथ, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन यांना बाद केले. त्याला तस्किन अहमद आणि एबादत होसैन या वेगवान गोलंदाजांनी चांगली साथ दिली.

तस्किन आणि होसैन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. या लक्षवेधी कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 198 धावसंख्येवर आटोपला.

महमूदची कसोटीमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची ही तिसरी वेळ होती. त्याने 2024 मध्ये चेन्नई कसोटीमध्ये भारताविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याची याआधीची सर्वोत्तम कामगिरी 43 धावांत 5 विकेट्स अशी होती, मात्र आता त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कामगिरी त्याच्या कसोटी कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वोत्तम ठरली आहे.

बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीमध्ये 5-fers
6/55 – हसन महमूद, डार्विन, 2026*
५/६२ – मोहम्मद रफिक, फतुल्लाह, २००६
५/६८ – शाकिब अल हसन, मीरपूर, २०१७
5/85 – शाकिब अल हसन, मीरपूर, 2017

महमूदची ही आकडेवारी कसोटी सामन्यांमध्ये बांगलादेशी वेगवान गोलंदाजांची सर्वोत्तम गोलंदाजीतील तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम आकडेवारी ठरली आहे.

कसोटी सामन्यांमध्ये बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांची सर्वोत्तम गोलंदाजी आकडेवारी
6/27 – शहादत हुसेन विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मीरपूर, 2008
6/46 – इबादत होसेन विरुद्ध न्यूझीलंड, माउंट मौंगानुई, 2022
6/55 – हसन महमूद विरुद्ध ऑस्ट्रेलिया, डार्विन, 2026*
6/64 – तस्किन अहमद विरुद्ध वेस्ट इंडिज, नॉर्थ साउंड, 2024
6/71 – रोबिउल इस्लाम विरुद्ध झिम्बाब्वे, हरारे, 2013
6/81 – मंजुरल इस्लाम विरुद्ध झिम्बाब्वे, बुलावायो, 2001

Comments are closed.