AUS vs BAN: कांगारूंचा अहंकार उध्वस्त! बांगलादेश कसोटी इतिहासात नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर

ऑस्ट्रेलिया संघ आणि बांगलादेश (Australia vs Bangladesh) यांच्यात कसोटी मालिका सुरू असून, कांगारू संघ सध्या अशा उंबरठ्यावर उभा आहे, जो यापूर्वी कधीही घडला नाही आणि आता तो प्रत्यक्ष घडताना दिसत आहे. दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका सुरू आहे आणि त्यातील पहिला सामना डार्विन येथे खेळला जात आहे. 3 दिवसांचा खेळ संपला असून, सध्या बांगलादेशचा संघ ऑस्ट्रेलियावर वरचढ ठरताना दिसत आहे.

यादरम्यान ह्या सामन्यात इतिहासात नोंदवला जाऊ शकतो कारण अजून दोन दिवसांचा खेळ बाकी असून, यात काहीतरी मोठा चमत्कार घडू शकतो. बांगलादेशचा संघ सध्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण पहिल्याच दिवशी संपूर्ण संघ अवघ्या 198 धावांत बाद झाला.

यानंतर बांगलादेशने फलंदाजी करताना 426 धावांचा मोठा डोंगर उभा केला. आपला दुसराच कसोटी सामना खेळणारा सलामीवीर तंजीद हसन तमीमने दमदार फलंदाजी करत 101 धावा केल्या. अशा प्रकारे बांगलादेशने पहिल्या डावाच्या आधारे 228 धावांची भक्कम आघाडी घेतली. एवढेच नाही तर, बांगलादेशने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपली दुसरी सर्वोच्च कसोटी धावसंख्याही नोंदवली. यापूर्वी 2016 मध्ये त्यांनी 427 धावा केल्या होत्या.

कंगारू संघ किमान दुसऱ्या डावात तरी चांगली फलंदाजी करेल अशी अपेक्षा होती, पण तसं घडलं नाही. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 4 बाद 161 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियन संघ अजूनही बांगलादेशच्या धावसंख्येपेक्षा 67 धावांनी मागे आहे आणि त्यांच्याकडे केवळ 6 खेळाडू शिल्लक आहेत. अद्याप दोन दिवसांचा खेळ बाकी आहे.

सर्वात महत्त्वाची आणि खास गोष्ट म्हणजे, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळले गेले आहेत आणि सध्या सातवा सामना सुरू आहे. यातील 5 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत, तर बांगलादेशने फक्त एकदाच बाजी मारली आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे. पण बांगलादेशने जो एकमेव सामना जिंकला होता, तो त्यांच्या घरच्या मैदानावर जिंकला होता. आता मात्र बांगलादेशचा संघ ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात हरवण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियन मैदानावर बांगलादेशने अद्याप एकही कसोटी सामना जिंकलेला नाही.

असं घडण्याचं कारण कदाचित हे असू शकते की, तब्बल 2003 नंतर आता बांगलादेशचा संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर गेला आहे. यापूर्वी जेव्हा 2003 मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळवली गेली होती, तेव्हा बांगलादेशचा संघ दोन्ही सामने हारला होता. बांगलादेशचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एकमेव कसोटी विजय 2017 मध्ये ढाक्यात मिळाला होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाला 20 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Comments are closed.