रत्नागिरीत २३ ऑगस्टला न्यायवेध सभा, सध्याच्या दडपशाहीवर ॲड. असीम सरोदे मांडणार रोखठोक भूमिका
हित फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्यावतीने दि.२३ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता रॉयल बॅंक्वेट सभागृह मिरजोळे येथे न्यायवेध सभा आयोजित करण्यात आली आहे.यासभेत संविधान,न्याय आणि लोकशाहीचा संवाद याविषयावर संविधान विश्लेषक ॲड.असीम सरोदे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती जनहित फाऊंडेशनचे संस्थापक प्रथमेश गावणकर यांनी दिली.
प्रथमेश गावणकर न्यायवेध सभा आयोजित करण्याचा उद्देश सांगताना म्हणाले की,संविधान हा लोकशाही चा गाभा आहे.लोकशाही मजबूत होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने संविधानाने आपल्याला दिलेले हक्क,अधिकार व जबाबदाऱ्या समजून घेतल्या पाहिजेत.मात्र सद्ध्या देशातील एकूण राजकीय सामाजिक परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे यावर समर्पक विचार मंथन व्हावे या उद्देशाने जनहित फाउंडेशनच्या माध्यमातून कायदेतज्ञ संविधान विश्लेषक ॲड असीम सरोदे मार्गदर्शन करणार आहेत.
Comments are closed.