खणाच्या साडीवर असा मिळवा पारंपरिक आणि ट्रेंडी लूक

पूर्वी नेसल्या जाणाऱ्या खणाच्या साडीची क्रेझ आता पुन्हा आली आहे. खणाच्या साडीची खास वीण, उठून दिसणारे रंग आणि रेशमी चमक यामुळे हल्ली सण-समारंभ, पूजा किंवा खास कार्यक्रमांसाठी महिला या साडीला पहिली पसंती देताना दिसतात. मात्र, या साडीवर कोणत्या दागिन्यांची निवड करावी याबाबत महिलांचा गोंधळ उडतो. विशेष करून महिला ऑक्सडाईज ज्वेलरीची निवड करतात. पण याव्यतिरिक्त खणाच्या साडीवर कोणते दागिने सर्वोत्तम दिसतील हे आज पाहूयात.

कोल्हापुरी दागिने

खणाच्या साडीचा खरा बाज हा कोल्हापुरी दागिन्यांमध्ये खुलून दिसतो. साडीवर ठुशी, कोल्हापुरी साखळी, मोहनमाळ किंवा चिंचपेटी ट्राय केल्यास एक अस्सल मराठी लूक मिळतो. पण यासाठी साडीमध्ये गोल्डन टच असायला हवा.

ऑक्सिडाइज्ड दागिने

जर तुम्हाला मॉडर्न आणि इंडो-वेस्टर्न लूक हवा असेल तर ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर दागिने सर्वोत्तम पर्याय आहेत. खणाच्या साडीवर मोठे ऑक्सिडाइज्ड नेकलेस, कानातले झुमके आणि हातात जाड कडे किंवा बांगड्या अतिशय स्टायलिश दिसतात.

पारंपरिक सोन्याचे दागिने

पूजा किंवा लग्नसमारंभासाठी खणाच्या साडीवर पारंपारिक सोन्याचे दागिने, जसे की लक्ष्मी हार, तन्मणी किंवा बोरमाळ अतिशय शोभून दिसतात.

नथ आणि कपाळावर चंद्रकोर

खणाच्या साडीचा लूक मोत्याची किंवा ऑक्सिडाइज्ड नथ आणि कपाळावर चंद्रकोर लावल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे साडीवर या दोन गोष्टी नक्की ट्राय कराव्यात.

बांगड्या

हातात खणाच्या साडीच्या रंगाशी जुळणाऱ्या काचेच्या बांगड्यांसोबत तोडे किंवा कडे घालावेत.

हेही वाचा – Jeans Top Combination :जीन्सच्या शेडनुसार योग्य रंगाचा टॉप कसा निवडावा?

Comments are closed.