Leg Cramps :पायात क्रॅम्प्स येण्याची कारणे आणि उपाय





रात्री झोपेत किंवा चालताना अचानक पायांत गोळा येणे किंवा क्रॅम्प्स येणे ही एक अतिशय सामान्य पण वेदनादायी समस्या आहे. शरीरातील पाण्याच्या कमतरतेपासून ते पोषणाच्या अभावापर्यंत अनेक कारणांमुळे ही समस्या उद्भवते. आज आपण पायात क्रॅम्प्स का येतात आणि त्यावर घरगुती उपाय कोणते, याविषयी जाणून घेऊयात. causes and remedies for leg cramps

कारणे –

  • रक्तातील सोडियम किंवा पोटॅशियमचे प्रमाण कमी-जास्त होणे.
  • डायलिसिसवर असणाऱ्या व्यक्तींच्या पायावर ताण येतो. ज्यामुळे पायात क्रॅम्प्स येतात.
  • आहारात मिठाचे सेवन करणे.
  • पायातील शुद्ध रक्तवाहिन्या आंकुचन पावल्यामुळे पायात क्रॅम्प्स येतात.
  • जास्त वेळ उभे राहून अतिश्रम केल्याने पायच्या नसा जड होतात आणि त्यांना रक्तपुरवठा होत नाही.

उपाय काय कराल?

  • शरीरातील वात वाढला असल्यास आयुर्वेदाचार्यांचा सल्ला घ्या.
  • शेवग्याच्या शेंगांची भाजी, उकडलेल्या अंड्याचा पांढरा भाग, डिंकाचे लाडू, कोबी असे कॅल्शियमयुक्त पदार्थ खावेत.
  • वजन आटोक्यात ठेवावे.
  • जीवनशैली बदला व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हलका व योग्य प्रमाणात व्यायाम करावा.
  • अतिथंड हवामान व अतिउष्ण हवामानात अधिक काळजी घ्यावी.
  • सतत बसून राहू नका.
  • जास्त प्रमाणात पाण्याचे सेवन करावे.
  • पायात गोळा आल्यास पाय सरळ करून पायाची बोटे वरच्या दिशेने ओढावीत.
  • वेदना होत असलेल्या भागावर हाताने किंवा गरम तेलाने हलक्या हाताने मालिश करावी.
  • बाधित भागावर गरम पाण्याचा शेक किंवा आईस पॅक लावावा.
  • पायांची हालचाल करावी.

हेही वाचा – रागावर नियंत्रण मिळवण्याचे 5 प्रभावी उपाय



Comments are closed.