लीलावती हॉस्पिटलचे कझाकिस्तानमध्ये पहिले आरोग्यसेवा केंद्र
लीलावती हॉस्पिटल सप्टेंबर २०२६पासून कझाकस्थानमध्ये सुपर-स्पेशालिस्ट आरोग्यसेवा केंद्राची सुरुवात करणार आहे. कझाकिस्तान हे केंद्र लीलावती हॉस्पिटलचा पहिला उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून लीलावती हॉस्पिटल मध्य आशिया व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आरोग्यसेवा पोहचवणारे केंद्र बनले आहे.
लीलावती हॉस्पिटलचे कझाकिस्तान सुपर स्पेशालिस्ट केंद्रात मध्य आशियातील रुग्णांना ऑन्कोलॉजी, लिव्हर आणि हेपॅटोबिलरी, किडनी आणि ट्रान्सप्लांटेशन, कार्डियाक सायन्सेस, आयव्हीएफ आणि रिप्रॉडक्टिव्ह मेडिसीन अशा विविध विभागांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा प्रदान केल्या जाणार आहेत.
गुंतागुंतीच्या केसेस किंवा शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी थेट मुंबईतील लीलावती हॉस्पिटलचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती लीलावती हॉस्पिटलच्या संस्थापिका, विश्वस्त आणि अध्यक्षा चारुबेन मेहता व रिसर्च सेंटरचे सीईओ डॉ. रवींद्र करंजेकर यांनी दिली. या केंद्रासाठी लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे विश्वस्त प्रशांत मेहता आणि इंडाशिया ग्लोबलचे संचालक डॉ. ताराचंद नेहरा यांचे विशेष सहकार्य लाभले.
Comments are closed.