शौर्या, लक्ष, इझेन गटविजेते

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आयडियल स्पोर्ट्स अॅकॅडमीतर्फे आयोजित बीओबी कप शालेय मुलामुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेमधील 8 वर्षांखालील गटात शौर्या गौरने, 10 वर्षांखालील गटात लक्ष परमारने तर 12 वर्षांखालील गटात इझेन विनीलने विजेतेपद पटकावले. शौर्या गौरने (5 गुण) व इझेन विनीलने (4.5 गुण) सर्वाधिक गुण नोंदवीत निर्विवाद अजिंक्यपदाला गवसणी घातली.

लक्ष परमारला विजेतेपदासाठी निर्णायक पाचव्या साखळी फेरीपर्यंत झुंजावे लागले. लक्षने अखेर निकिता संदीपचे (4.5 गुण) बरोबरीचे आव्हान सरस सरासरीच्या बळावर मागे टाकले. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी व नवनाथ दांडेकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या उपस्थितीत विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

Comments are closed.