पालिका सभागृह, समित्यांचे अहवाल आता ऑनलाइन; कोट्यवधीचा खर्च वाचणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई महानगरपालिकेच्या महासभेसह वैधानिक समित्या आणि इतर समित्यांचे अहवाल आता नगरसेवकांना मोबाईलवर पीडीएफच्या स्वरूपात ऑनलाइन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासाठी बोर्ड पॅक या कंपनीच्या माध्यमातून सिस्टीम विकसित केली जात असून यावर सुमारे ४२.७७ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. त्यामुळे प्रिंटिंगसह कोट्यवधीचा खर्च वाचणार असून नगरसेवक डिजिटल होणार आहेत.

नगरसेवक होणार डिजिटल
मुंबई महापालिकेतील २३७नगरसेवकांना महापालिका सभा तसेच स्थायी, शिक्षण, सुधार व बेस्ट या चार तसेच १७ प्रभाग समिती या वैधानिक समित्यांसह स्थापत्य शहर, स्थापत्य उपनगरे, विधी व महसूल, महिला व बाल कल्याण, सार्वजनिक आरोग्य, उद्यान व बाजार समिती आदी विशेष समित्यांच्या पटलावर ठेवण्यात येणाऱ्या विषय पत्रिकांचे अजेंडा सहपत्रासह प्रत्येक नगरसेवकांना त्यांच्या घरी पाठवले जातात. यासाठी कोट्यवधीचा खर्च होतो.

डिजिटल मीटिंग मॅनेजमेंट सिस्टीम
यासाठी पालिकेने डिजिटल मीटिंग मॅनेजमेंट सिस्टीम विकसित केली आहे. या प्रणालीचा वापर नगरसेवक आणि अधिकारी हे आपल्या मोबाईलमध्ये करू शकतात. तसेच टॅब, आयपॅडमध्येही करू शकतात. यामध्ये अजेंडा तयार करणे, मंजुरी आणि प्रसारणासह बैठकीच्या सूचना व स्मरणपत्रे, मागील बैठकीचे संक्षिप्त विवरण, डॅशबोर्ड व अहवाल सुविधा आदींचा समावेश असेल.

Comments are closed.