पुन्हा लक्ष्मण प्रशिक्षक, आशियाई स्पर्धेत छोटा चमूः क्रिकेटसाठी मोठा ताफा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत ६६१ सदस्यीय चमू उतरविणाऱ्या हिंदुस्थानने यंदा तुलनेने छोट्या चमूची तयारी केली आहे. हिंदुस्थान ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) ३६ क्रीडा प्रकारांत ५०४ खेळाडूंना सहभागी करून घेण्यासाठी केंद्र सरकारकडे मंजुरी मागितली आहे. या चमूत २७५ पुरुष आणि २२९ महिला खेळाडूंचा समावेश आहे. हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी व्हीव्हीएस लक्ष्मण यांची वर्णी लागली आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक लक्ष्मण असतील. माजी कसोटीपटू सुनील जोशी गोलंदाजी प्रशिक्षक, तर ऋषिकेश कानिटकर फलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळतील. शुभदीप घोष क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असतील. महिला संघाचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार असून, अविष्कार साळवी गोलंदाजी आणि मुनीष बाली क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असतील.

Comments are closed.