पाऊट आणि आरशात पाहण्याच्या कमेंटवरून रंगली गंमत जंमत; समालोचन सुरू असताना संजय मांजरेकर आणि मुरली कार्तिक यांच्यात चेष्टामस्करी
श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी समालोचन सुरू असताना हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू, समालोचक संजय मांजरेकर आणि मुरली कार्तिक यांनी धम्माल उडवली. जेवणाच्या ब्रेक दरम्यान स्टुडिओमध्ये असलेल्या मुरली कार्तिकने गॉल येथून समालोचन करत असलेल्या मांजरेकरांची खिल्ली उडवली. स्टुडिओमधून बोलताना कार्तिकने, तुमचा पाउट चांगला आहे, पण त्यामुळे तुम्ही नेमके काय बोलत आहात हे समजणे कठीण होते, अशी टिप्पणी केली. या कमेंटवरून दोघांमध्ये जुगलबंदी रंगली.
कार्तिक याच्या या टिप्पणीमुळे मांजरेकर गालातल्या गालात हसले आणि त्यांनी लगेचच त्याला प्रत्युत्तर दिले. मांजरेकरांनी पॅनेलला कॅमेरा अजिंक्य रहाणेकडे वळवण्यास सांगितले. स्प्लिट स्क्रीन करून दुसऱ्या व्यक्तीकडे कॅमेरा नेता येईल का, अशी विनंती केली तेव्हा स्टुडिओत सारेच हसू लागले. गमतीजमतीत मांजरेकरांनी रहाणेसोबत बोलणे अधिक आनंददायी असल्याचे म्हटले. तसेच कार्तिक यांच्यावर निशाणा साधत, मुरली कार्तिक आरशात स्वतःकडे पाहत ‘शानदार’ म्हणत असतील, असा टोमणा मारला.
ते त्वरीत वाढले! 😂
शॉट्स उडवले गेले, पुनरागमन झाले आणि आमच्या एक्स्ट्रा इनिंग्स पॅनलला पूर्ण हशा आला! 😅
पहा #SLvINDपहिली कसोटी | दिवस 3, आता थेट सोनी स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनेल आणि सोनी LIV वर.#SonySportsNetwork #SonyLIV #BeautifulGameOfTestCricket pic.twitter.com/hnJ0WPAgok
— सोनी स्पोर्ट्स नेटवर्क (@SonySportsNetwk) 17 ऑगस्ट 2026
मांजरेकरांच्या या प्रतिक्रियेला मुरली कार्तिक यांनीही प्रत्युत्तर देत म्हटले की, ‘मी आरशात स्वतःला पाहत नाही. ते फक्त तुम्ही करता’. कार्तिक यांच्या या उत्तरानंतर मांजरेकरांनी पुन्हा पलटवार केला. ते म्हणाले की, आरशात पाहण्याचा फायदा असतो. तुमच्यासाठी मात्र तसं करणं फारसं आनंददायी नसावं, असा टोमणा मारला. यानंतर दोघांनाही विषय आवरता घेतला. हे असेच सुरू राहिलेतर दोघांनीही मर्यादा ओलांडल्यासारखे होईल आणि सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय ठरेल, असे मांजरेकर म्हटले. प्रसारण करणाऱ्या चॅनेलने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चर्चिला जात आहे.
Comments are closed.