अमेरिकेतील ग्रीन कार्ड मंजुरी 35 टक्क्यांनी घटली, हिंदुस्थानच्या नागरिकांना सर्वाधिक फटका
अमेरिकेतील महत्त्वाच्या ग्रीन कार्डच्या मंजुरीत मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. असाधारण काwशल्य असलेल्या कामगारांसाठी ‘ईबी-1ए’ ग्रीन कार्डच्या मंजुरीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये सुमारे 35 टक्के घट नोंदविण्यात आली आहे. याचा सर्वाधिक फटका हिंदुस्थानातील अर्जदारांना बसला आहे.
‘बाऊंडलेस इमिग्रेशन’ या संस्थेच्या अहवालात अमेरिकेच्या नागरिकत्व आणि स्थलांतर सेवा विभागाकडे दाखल झालेल्या अर्जांच्या आधारे माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी हिंदुस्थानी नागरिकांच्या ईबी-1ए या अर्जांच्या मंजुरीचे प्रमाण 49.1 टक्के होते, ते 35 टक्क्यांनी घसरले आहे. या कालावधीत 7 हजार 316 हिंदुस्थानी नागरिकांनी अर्ज दाखल केले. त्यापैकी 2,571 अर्ज मंजूर करण्यात आले असून 1,131 अर्ज नामंजूर झाले आहेत.
हिंदुस्थानच्या आयटी तज्ञांमध्ये घट
अहवालातील आकडेवारीनुसार, अर्ज मंजूर होण्यातील घट ही प्रामुख्याने हिंदुस्थानच्या आयटी क्षेत्रातील कामगारांमध्ये दिसत आहे. हिंदुस्थानपाठोपाठ चीनच्या अर्जदारांचा क्रमांक लागतो. ट्रम्प प्रशासनाने अलीकडच्या काळात कठोर स्थलांतर धोरण राबविले आहे. त्यामुळे ही घट झालेली आहे.
Comments are closed.