PAK vs ENG पाकिस्तान क्रिकेट संघाची इंग्लंडसमोर पुन्हा नाचक्की! सातव्यांदा घडला हा दयनीय प्रकार

पाकिस्तान क्रिकेट संघाची (Pakistan cricket team) इंग्लंडमधील कामगिरी अत्यंत खराब सुरू आहे. सध्या सामन्याचा तिसराच दिवस सुरू असून, पाकिस्तानची अशी दयनीय अवस्था झाली आहे जी पाहून कोणालाही हसू येईल. पहिल्या डावाच्या आधारावर संघ आधीच पिछाडीवर होता, आणि त्यानंतर जेव्हा पाकिस्तानचा दुसरा डाव सुरू झाला, तेव्हा संघाचे खातेही उघडले नव्हते आणि पहिली विकेट पडली. संघासोबत अशी दुर्दैवी घटना कसोटी इतिहासात सातव्यांदा घडली आहे.

इंग्लंड आणि पाकिस्तान (England vs Pakistan) यांच्यात 3 कसोटी सामन्यांची मालिका सुरू असून, पहिला सामना लीड्स येथे खेळला जात आहे. पाकिस्तानचा पहिला डाव अवघ्या 171 धावांवर आटोपला. यानंतर फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंड संघाने 409 धावांचा डोंगर उभा केला. म्हणजेच इंग्लंडने पहिल्या डावाच्या आधारावरच 234 धावांची मोठी आघाडी घेतली.

इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने धमाकेदार 91 धावांची खेळी केली. तसेच जॉर्डन कॉक्सने 73 आणि जो रूटने 66 धावांचे योगदान दिले. या सर्व धावसंखेनंतर पाकिस्तानच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. डावाच्या दुसऱ्याच षटकात सलामीवीर इमाम-उल-हक खाते न उघडताच बाद झाला. त्यानंतर चौथ्या षटकात दुसरा सलामीवीर अजान अवैस देखील फक्त 9 धावा काढून माघारी परतला.

विशेष म्हणजे, पाकिस्तानचा पहिला डाव सुरू झाला तेव्हाही संघाची पहिली विकेट खाते उघडण्यापूर्वीच पडली होती; तेव्हा अजान अवैस सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. अगदी तसाच प्रकार दुसऱ्या डावातही पाहायला मिळाला.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये दोन्ही डावांत संघाची पहिली विकेट शून्य धावसंख्येवर जाण्याची ही 24 वी वेळ आहे. तर पाकिस्तानसोबत असे होण्याची ही 7 वी वेळ आहे. इंग्लंडच्या मैदानावर हा खराब विक्रम पाचव्यांदा घडला आहे. याआधी 2010 पासून आतापर्यंत पाकिस्तान संघाची पहिल्या विकेटसाठी एकही 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी झालेली नाही. केवळ 51 धावांपर्यंत पोहोचत पोहोचत संघाचे 3 मोठे फलंदाज तंबूत परतले होते. आता या सामन्यात पाकिस्तानवर डावाने पराभूत होण्याची मोठी टांगती तलवार आहे.

Comments are closed.