व्हीपीएमचा दबदबा
“नुकत्याच कांदिवलीच्या साई केंद्रात रंगलेल्या मुंबई उपनगर जिल्हा ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत दहिसरच्या व्ही. पी. एम. स्पोर्ट्स क्लबने तब्बल ९९ गुणांची कमाई करत सांघिक विजेतेपदावर दणदणीत मोहर उमटवली. सांघिक विजेतेपदाचा मानाचा चषक दहिसरच्या ताफ्याने उंचावला. विजेत्या संघाला मुंबई उपनगर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष कॉलिन सँटोस, सरचिटणीस दयानंद शेट्टी आणि सहचिटणीस विवेक संखे यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला.”
Comments are closed.