सार्थक चव्हाणला विजेतेपद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पुण्याचा १९ वर्षीय आणि ‘पेट्रोनास टीव्हीएस रेसिंग’ संघाचा मराठमोळा खेळाडू सार्थक चव्हाण याने ‘एमआरएफ इंडियन नॅशनल रेसिंग चॅलेंज’ स्पर्धेत विजेतेपद पटकावले. सार्थकने ‘सुपर स्पोर्ट ३०१-४०० सीसी’ या गटात शेवटच्या फेरीत (लॅप) घेतलेल्या एका धाडसी चालीमुळे नाट्यमयरीत्या विजय मिळवून विजेतेपदावर आपले नाव कोरले.

मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर झालेली ही शर्यत सार्थक चव्हाणने अतिशय रोमांचक पद्धतीने जिंकली. सहा फेऱ्यांच्या या शर्यतीमध्ये ‘टर्न-२’ वर रक्षित दवे आणि सॅव्हियन साबू यांच्यात मोठा अपघात झाला; सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. शर्यतीतील बहुतांश वेळेत सार्थक हा पोल-सिटर (सर्वात पुढे सुरुवात करणारा खेळाडू) असलेला त्याचा सहकारी चिरंत विश्वनाथ आणि राहिल पिलारीसेट्टी या दोघांच्या मागे होता.

Comments are closed.