90चा काळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा सिंह यांचं निधन – Tezzbuzz
ज्येष्ठ अभिनेत्री आशा सिंह या चित्रपट आणि दूरदर्शन विश्वातील आपल्या दमदार अभिनेत्री होत्या. त्याचे 22 ऑगस्ट रोजी मुंबईत निधन झाले. नुकतेच त्याचा मुलगा आकाश सिंह भारव्दाज यांनी दिलेल्या माहीतीनुसार त्या गेल्या तीन महिन्यांपासुन फुफ्फुसाच्या संसर्गाशी लढत होत्या आणि शेवटी त्यांनी शुक्रवारी त्यांचे प्राण सोडले. त्यांच्या निधनाने त्यांचे चाहते आणि कलाकर दोघांही हळहळ व्यक्त करत आहेत. आशा सिंह यांचे पुत्र आकाश यांनी दिलेल्या माहीतीनुसार त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे आणि यावेळी त्यांचे काका नागपुरहुन आले होते.
आकाश सिंह यांनी सोशल मीडियावर आपल्या आई आशा यांच्या निधनाची बातमी शेअर करत दु:ख व्यक्त केले आणि यांनी भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी लिहले आहे की, मी आणि माझी आई एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलोय. तीने हसतमुखाने या जगाचा निरोप घेतला आहे. आशा सिंह यांच्यासाठी ही एक शोकसंदेश पोस्ट आहे. असे त्यांनी यात म्हणले आहे. तर त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत वर्षानुवर्षे त्यांच्या कामाची प्रशंसा करणाऱ्यांमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अभिनेत्री आशा सिंह भारतीय मनोरंजन उद्योगातील एक सुप्रसिद्ध चेहरा होत्या. त्यांनी अनेक वर्षे असंख्य चित्रपट, दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले होते. आशा सिंह यांनी बी.आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या ऐतिहासिक टीव्ही मालिकेत कृपाची भूमिका साकारली होती, जी कृपाचार्यांची बहीण, द्रोणाचार्यांची पत्नी आणि अश्वत्थामाची आई होती.
हेही वाचा
मोहसिन खानने केला साखरपुडा, अन् होणारी पत्नी तमन्नाचा चेहरा केला रिव्हील
Comments are closed.