“कुणी हद्द पार केली तर त्याला…”, कोलंबोतील राड्यावर यशस्वी जैस्वालने मौन सोडले, दिग्गज समालोचकाला खडेबोल सुनावले
हिंदुस्थान आणि श्रीलंका संघात कोलंबोत दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी हिंदुस्थानचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. भर मैदानात झालेल्या या राड्यामुळे यशस्वीवर चौफेर टीका होत आहे. प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनीही यशस्वीच्या वर्तनावर टीका करत त्याला शांत राहण्याचा सल्ला दिला. मात्र यशस्वीने हर्षा भोगले यांच्या व्हिडीओखाली थेट कमेंट करत त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. क्रीडा वर्तुळामध्ये सध्या याचीच चर्चा रंगली आहे.

Comments are closed.