सूरज, साक्षी अव्वल स्थानी
अवघ्या तीन मिलिसेकंदांच्या फरकाने आपल्याच संघ सहकाऱ्याला मागे टाकत पहिल्या ठाणे स्मार्ट सिटी मॅरेथॉन स्पर्धेत सूरज झोरेने पुरुषांच्या 10 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत बाजी मारली. याच अंतराच्या महिलांच्या शर्यतीत साक्षी पवारने अव्वल स्थान मिळवले.
पूर्व ठाण्यात पहिल्यांदाच झालेल्या ठाणे स्मार्ट सिटी मॅरेथॉनला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध आठ गटांमध्ये रंगलेल्या या ठाणे स्मार्ट सिटी मॅरेथॉनमध्ये सुमारे दोन हजारांहूनअधिक धावपटू सहभागी झाले होते. त्यात ठाणे जिह्यातील अंबरनाथ येथील रन हॉलिक्सच्या धावपटूंनी निर्विवाद वर्चस्व राखले. पुरुष गटातील 10 हजार रुपयांचे रोख बक्षीस आपल्या खिशात घालताना सूरजने 30 मिनिटे 36 सेकंद अशी वेळ नोंदवली.
दुसऱया स्थानावर राहिलेल्या संदीपकुमार रामेश्वरने ही शर्यत 30 मिनिटे 43 सेकंदांत पूर्ण केली. त्यांच्याच संघातील रोशन रहाटेने 32 मिनिटे 46 सेकंदांत हे अंतर पार केले. पुरुषांप्रमाणे महिला गटातील शर्यतीही रन हॉलिक्सच्या धावपटूंनी वर्चस्व गाजवले.
Comments are closed.