गणपती उत्सवापूर्वी साखरपा-देवडे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा, शिवसेनेची मागणी
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा – देवडे रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्याला अनेक ठिकाणी खड्यांचे ग्रहण लागले आहे. डांबरीकरण पूर्णपणे उखडले आहे. हा मार्ग परिसरातील नागरिकांचा दळणवळणाचा असल्याने रस्त्यावरून प्रवास करताना खड्डे चुकवून रस्ता शोधावा लागतो. गणेशोत्सवा पूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पंचायत समिती सदस्य विद्यासागर तांदळे यांनी केली आहे.
साखरपा ते देवडे मार्गांवरील सर्व नागरिकांना साखरपा मुख्य बाजारपेठेत असल्याने त्यांना या पेठेवरच अवलंबून रहावे लागते. खड्यामुळे लहान गाड्या घसरून अपघात झाल्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे रुग्णवहीका जाण्यास व येण्यास विलंब होतो. रस्त्याच्या कडेला असणारी झाडी वाहनधारकांना अडचणीचे होत असून दोन्ही बाजूने वाहने आल्यास व साईडपट्टीला काटाळी पडल्याने वाहने पास करण्यास अत्यंत्य जिकरीचे बनले आहे.
त्यातच गणेशोत्सव काही दिवसांवर आल्याने रस्त्याची डागडुजी डांबर खडीने तातडीने भरण्याची मागणी पंचायत समिती सदस्य विद्यासागर तांदळे यांनी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग देवरुख ( संगमेश्वर ) यांच्याकडे केली असून त्यासंबंधी त्यांना लेखी पत्र दिले आहे.
Comments are closed.