पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती, मॅच रेफरी म्हणून नवी इनिंग….

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आणखी एका खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बुधवारी (26 ऑगस्ट) स्पष्ट केले की वेगवान गोलंदाज आयमान अन्वर हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्काळ प्रभावाने निवृत्ती जाहीर केली आहे. तिने तीन टी 20 विश्वचषक आणि 2022 च्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकात देशाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे.

अन्वरने गुडघ्याच्या दुखापतीमुळे निवृत्तीचा निर्णय घेतला. आता ती सामानाधिकारी म्हणून आपली नवी कारकीर्द सुरू करत आहे, अशी माहिती तिने X वर दिली आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले, “सामना पंच (मॅच रेफरी) म्हणून एका नवीन पर्वाची सुरुवात करताना माझ्या कारकिर्दीतील मागील टप्प्याचा समारोप होत असला, तरी माझे एकूणच ‘जीवन-पुस्तक’ मात्र तेच राहणार आहे.”

“माझ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीचा हा अध्याय पूर्ण करत असताना, मी अत्यंत कृतज्ञता आणि अभिमानाने त्या काळाकडे पाहतो; सोबतच अशा असंख्य आठवणी आहेत ज्या माझ्या प्रवासाचा कायमचा भाग बनून राहतील,” असेही तिने पुढे पोस्टमध्ये लिहिले आहे.

अन्वरने 2016 मध्ये पाकिस्तान महिला संघाकडून पदार्पण केले. साऊथ्मप्टन येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात तिने एक विकेट घेण्याची कामगिरी केली होती. तिने तिच्या कारकीर्दीत 37 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. तसेच ती आपल्या संघाकडून टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी 37 वी खेळाडू ठरली, हा विशेष योगायोग तिच्याबाबतीत घडला आहे. तिने पाकिस्तानसाठी आठ वनडे सामनेही खेळले आहेत.

34 वर्षीय खेळाडूने टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 29 विकेट्स आणि वनडे सामन्यांमध्ये चार विकेट्स घेतल्या आहेत. ती 2018, 2020 आणि 2023 मध्ये झालेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या पाकिस्तान संघाचा भाग राहिली आहे.

राष्ट्रीय संघासाठी अन्वरने तिचा शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयसीसी महिला टी 20 विश्वचषक 2023 मध्ये खेळला.

त्याचबरोबर अन्वर 2022 मध्ये न्यूझीलंडमध्ये आयोजित आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत खेळली होती. त्यामधील इंग्लंडविरुद्धचा साखळी फेरीतीली सामना हा तिचा कारकीर्दीतील शेवटचा वनडे सामना ठरला, तर तिचा शेवटचा टी 20 आंतरराष्ट्रीय सामना टी 20 विश्वचषक 2023 मधील वेस्ट इंडिजविरुद्धचा साखळी सामना होता. (Pakistan pacer Aiman Anwer announces retirement from international cricket)

Comments are closed.