रक्षाबंधनानिमित्त ‘बेस्ट’च्या 136 जादा बसगाड्या धावणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने मुंबई शहर आणि उपनगरांत प्रवास करणाऱया मुंबईकरांच्या सोयीसाठी ‘बेस्ट’ उपक्रमाने विशेष नियोजन केले आहे. शुक्रवारी संपूर्ण दिवसभरात ‘बेस्ट’च्या 136 जादा बसगाड्या प्रवाशी सेवेत धावणार आहेत. प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेत प्रशासनाने जादा गाड्यांबाबत निर्णय घेतला आहे. भाऊ-बहिणीच्या नात्याचा पवित्र सण असलेला रक्षाबंधन शुक्रवारी साजरा होणार आहे. या दिवशी मुंबईच्या रस्त्यांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. संभाव्य गर्दी लक्षात घेत बेस्ट उपक्रमाने यंदाही जादा बसगाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे. शहर आणि उपनगरांतील विविध मार्गांवर 136 जादा गाड्या धावतील. या बसगाड्यांचे प्रवर्तन सकाळी 10.30 वाजल्यापासून दिवसभर सुरू राहील. प्रवाशांची गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार आणखी जादा बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

Comments are closed.