इम्रान खान यांना तुरुंगातच मारण्याचा कट, मुलांनी व्यक्त केली चिंता
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात मारण्याचा कट रचण्यात आला असून त्यांच्या जीवाला तिथे धोका आहे, अशी भीती इम्रान खान यांच्या मुलांनी व्यक्त केली आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार माईक आथर्टन यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत इम्रान खान यांची मुले सुलेमान आणि कासिम यांनी गंभीर आरोप केले.
कासिमने सांगितले, की सध्याची परिस्थिती पूर्वीपेक्षा भयानक आहे. इम्रान यांना जास्तीत जास्त वेळ तुरुंगात ठेवून कायमचे गप्प करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना दिवसातील 23 तास कोठडीत एकाकी ठेवले जात आहे. स्वतः इम्रान यांनी नातेवाईकांना याबाबत सांगितले होते. त्यांनी तुरुंगात इतर राजकीय कैद्यांच्या मृत्यूचा दाखला देत स्वतःच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. इम्रान खान यांना तत्काळ खासगी रुग्णालयात नेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, काही तासांमध्येच त्यांना सरकारी रुग्णालयात नेले आणि पुन्हा तुरुंगात पाठवले. त्यांची निष्पक्ष डॉक्टरांकडून तपासणी होऊ दिली जात नाही. प्रशासन काय लपवत आहे, असा सवाल सुलेमान याने उपस्थित केला.
Comments are closed.